Breaking: केम येथील संतप्त शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयास ठोकले टाळे
केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम येथील महावितरण (MSEB KEM) कार्यालयास संतप्त शेतकरयांनी टाळे ठोकत संताप व्यक्त केला आहे. ए पी ग्रुप चे संस्थापक अध्यक्ष श्री. अच्युत काका पाटील यांच्या नेतृत्वाखाली केम येथील महावितरण कार्यालयास संतप्त शेतकऱ्यांनी टाळे ठोकले आहे. गेल्या आठवड्यात महावितरण कंपनीकडून शेतीपंपाचा वीजपुरवठा वीज बील वसुलीसाठी अचानक दोन तास केलेला होता. तो दोन दिवसात पूर्ववत व सुरळीत आठ तास करा अन्यथा केम येथील महावितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असा इशारा शेतकऱ्यांनी दिला होता.
कोरोना काळात आवाजवी वीज बिले आलेली असून ती बिले भरण्याची क्षमता सध्या शेतकऱ्यांमध्ये नाही. शेतकरी विविध कारणांनी संकटात आलेला असल्याने वीज बिल भरण्याच्या अवस्थेत नाही. अवाजवी बिलं दुरुस्त करण्याची घोषणाही प्रत्यक्षात आली नाही. कोरोना प्रसारापूर्वी या सरकारच्या ऊर्जामंत्र्यांनीच १०० युनिट पर्यंतचे वीज बिलं माफ करण्याचे आश्वासन दिले होते. हे आश्वासनही प्रत्यक्षात आले नाही. जर दिलेली आश्वासने पूर्ण करायची धमक नसेल तर निदान अशी सक्तीने वीज बिलं वसूली करून अगोदरच आर्थिक संकटात असलेल्या शेतकरी बांधवांना आठ तासावरून दोन तास वीज देऊन जखमेवर मीठ चोळले जात आहे अशी भावना केम येथील शेतकरयांनी बोलून दाखवली.
यावेळी बोलताना ए पी ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष अच्युत काका पाटील म्हणाले की, दोनच तास वीजपुरवठा अशातच विजेचा लपंडाव, यामुळे शेतकरी हैराण झाले होते. शेतातल्या पिकांना पाण्याची नितांत गरज असताना गेल्या काही दिवसापासून ग्रामीण भागात शेतीच्या पाणी पुरवठ्याचा वीज पुरवठा खंडित करण्यात आला आहे. शेतकऱ्याची तुर, ऊस तसेच इतर पाणी असतानाही निव्वळ वीज पुरवठा खंडित केल्यामुळे जळायला लागली आहेत. या घटनेच्या निषेधार्थ महावितरणच्या कार्यालयास टाळे ठोकण्यात आले आहे.
यावेळी शिवाजी मुळीक, रमेश तळेकर, पिनू ओहोळ, किरण तात्या तळेकर, भैय्या तळेकर, पिनू तळेकर, विजयसिंह ओहोळ, भाऊ तळेकर, महेश तळेकर, अक्षय तळेकर, मोरे साहेब, अनिल तळेकर, राजाभाऊ तळेकर, तानाजी तळेकर, सोमनाथ तळेकर, सचिन जाधव आदि शेतकरी उपस्थित होते.
महावितरण कंपनीने शेतकऱ्यांना वीजबील भरण्यासाठी मुदत द्यावी. अशी अचानक वीज दोन तास करणे चुकीचे आहे. शेतकऱ्यांची पीके पाण्या अभावी जळायला लागली आहेत. सध्या शेतकऱ्यांकडे पैसे नाहीत. दिवाळी सण तोंडावर आला आहे. ऊस गेला आणि हातात पैसे आल्यावर आम्ही वीज बील भरणार आहोत. आता शेतकऱ्यांच्कडे पैसे नाहीत. दिवाळी तोंडावर आली आहे.
महावीर आबा तळेकर शेतकरी
आता पुढील आंदोलन कंदर, जेऊर येथील वीज वितरण कार्यालयाला टाळे ठोकणार असे सामाजिक कार्यकर्ते अच्युत काका पाटील यानी सांगितले.




