-->
करमाळाविशेष

कंदर केंद्राची शिक्षण परिषद उत्साहात संपन्न; विविध शैक्षणिक विषयांवर झाली चर्चा

 

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

माहे ऑक्टोबर २०२१ ची कंदर केंद्राची आँफलाईन शिक्षण परिषद कोरोना बाबतचे सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करत कण्वमुणी विद्यालय, कंदर या ठिकाणी आयोजित केली होती. या शिक्षण परिषदेच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य श्री. वसंतराव नलवडे सर, प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. श्री. मच्छिंद्र नागरे सर, सचिव श्री. सुनिल भांगे सर, केंद्र प्रमुख श्री. साईनाथ देवकर, मच्छिंद्र नुसाते, कण्वमुणी विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. भोसले सर तसेच सर्व शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक उपस्थित होते.

 

माहे ऑक्टोबर २०२१ शिक्षण परिषदेचे प्रास्ताविक केंद्र प्रमुख श्री. साईनाथ देवकर यांनी केले. तर श्री. सखाराम राऊत, श्री. शहाजी बादल, श्री. भालचंद्र गावडे, श्रीमती रोहिणी गायकवाड यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मा. मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीपजी स्वामी साहेब यांच्या संकल्पनेतून शिक्षक निबंध स्पर्धा व मुख्याध्यापक निबंध स्पर्धेतील विजेत्यांचा सन्मान करण्यात आला. मुख्याध्यापक निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती सारिका आंधळकर यांनी तर व्दितीय क्रमांक श्री. गुरूदास गोयकर, श्रीमती जयश्री साळूंके यांनी, तृतीय क्रमांक श्री. संतोष आंबेकर, श्री. भास्कर खुपसे यांनी विभागून तसेच उत्तेजनार्थ श्री. सखाराम राऊत यांनी यश मिळवले. शिक्षक निबंध स्पर्धेत प्रथम क्रमांक श्रीमती शारदा जवळगे यांनी, द्वितीय क्रमांक श्रीमती रत्नमाला होरणे, श्री. जिवन धेंडे, तृतीय क्रमांक श्रीमती रेश्मा पारखे यांनी तर उत्तेजनार्थ श्रीमती रोहिणी गायकवाड व श्री. किरण सानप यांनी यश मिळविले. या सर्व यशस्वी शिक्षकांचा केंद्रप्रमुख श्री. साईनाथ देवकर यांच्या वतीने व मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात आला.

 

यावेळी डॉ. मच्छिंद्र नागरे सर यांनी शिक्षण पद्धतीवर अतिशय छान मार्गदर्शन केले. तर श्री. भालचंद्र गावडे सर यांनी ट्रेकिंगचे फायदे आणि अनुभव या ऐनवेळच्या विषयावर उत्तम मार्गदर्शन केले. या शिक्षण परिषदेत नवनियुक्त मुख्याध्यापक पदोन्नती मिळालेले श्रीमती जयश्री शिंदे व श्रीमती जयश्री साळूंके यांचा सन्मान करण्यात आला. अशा प्रकारे विविध शैक्षणिक विषयावर चर्चा करीत ही शिक्षण परिषद उत्साहात संपन्न झाली. या शिक्षण परिषदेमध्ये सुत्रसंचालन श्री. बल्लाळ सर यांनी केले तर आभार श्री. रमेश कोडलिंगे सर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close