केममध्ये मुख्य रस्त्यावरील खड्ड्यात अडकले टमटम; नागरिकांमधून होत आहे रस्ता दुरुस्तीची मागणी
केम प्रतिनिधी/संजय जाधव


केम गावाच्या वेशी जवळील मुख्य रस्त्यावर आज दुपारी साडेबारा वाजल्या च्या सुमारास शेतीची अवजारे घेऊन आलेले एक चार चाकी टमटम (छोटा हत्ती) भर रस्त्यावर पडलेल्या खडयात अडकले. त्यामुळे इतर वाहनधारकांची गैर सोय होऊन काही काळ वाहतूक खोळंबली.

केम येथील वेशी समोरून मलवडी, वडशिवणे, कंदर या गावांना तर माढा तालुक्यातील भोगेवाडी, रोपळे या गावांना जाणारा प्रमुख रस्ता आहे. या प्रमुख रस्त्यावर जून महिन्यापासून खड्डे पडलेले आहेत. यापूर्वीही या खड्ड्यांमध्ये दुचाकी वाहने अडकली होती. गावातील सांडपाणी या रस्त्यावरील पडलेल्या खड्ड्यात जाते. याबाबत वारंवार पाठपुरावा करून देखील ग्रामपंचायती कडून दुर्लक्ष होत आहे. असे येथील पत्रकार नाना देवकर यानी सांगितले.
आज गुरूवारी दुपारी शेतीची अवजारे घेऊन एक छोटा हत्ती केमला आला होता. वाहन चालकाला रस्त्यावरील पाण्यामुळे खड्ड्यांचा अंदाज न आल्याने हे टमटम खडयात अडकले. त्यामुळे काही काळ या रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा झाला. या वाहन चालकाने जेसीबी बोलावून रस्त्यावर अडकलेली गाडी बाजूला काढली. त्यानंतर वाहतूक सुरळीत चालु झाली. हा रस्ता गावच्या वेशी जवळील मुख्य रस्त्या असून तो त्वरीत दुरूस्त करावा अशी मागणी केम मधील ग्रामस्थांमधून होत आहे.




