प्रतिनिधी / संजय साखरे


करमाळा तालुक्यातील राजुरी येथे आज दिनांक ०६/०९/२०२१ रोजी कोरोना या महामारीच्या पार्श्वभूमीवर तसेच ग्रामीण भागातील कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज राजुरी येथे कोरोना लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

सदर लसिकरण शिबिरामध्ये १८ ते ४४ या वयोगटातील ११० नागरिकांना, ४५ ते ५९ वयोगटातील ११८ नागरिकांना तर ६० वर्षाच्या पुढील पंचवीस नागरिकांना असे एकूण २५३ नागरिकांना लसीचे डोस देण्यात आले. या लसीकरण शिबिरासाठी कोर्टी प्राथमिक आरोग्य केंद्राचे डॉक्टर रवी शिंदे, आरोग्य सेवक दहिफळे, टेकाळे सिस्टर, देशमुख सिस्टर यांनी लसीकरण यशस्वीरित्या पार पाडले.
या वेळी लसीकरण शिबिरासाठी ग्रामसेवक श्री. रामेश्वर गलांडे, सरपंच डॉक्टर अमोल दुरंदे, सामाजिक कार्यकर्ते श्रीकांत साखरे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी येथील शिक्षक, अंगणवाडी सेविका व आशा वर्कर यांनी परिश्रम घेतले.




