-->
करमाळाविशेष

विश्व हिंदू परिषद बजरंग दलाच्या वतीने ७ मार्चला करमाळा शहरात त्रिशूल दीक्षा व शौर्य संचलन

 

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण (माय मराठी न्यूज)

 

श्रीराम नवमीचे औचित्य साधून विश्व हिंदू परिषद बजरंग दल करमाळा तालुका यांच्या वतीने सोमवार दि. ७ मार्च रोजी त्रिशूल दीक्षा समारंभ व शौर्य संचलन याचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमासाठी बजरंग दलाचे मुंबई क्षेत्र संयोजक श्री. विवेकजी कुलकर्णी, पश्चिम महाराष्ट्र प्रांत संयोजक श्री. नितीनजी महाजन तसेच पश्चिम महाराष्ट्र प्रांत सहसंयोजक श्री. संदेशजी भेगडे उपस्थित राहणार आहेत.

 

त्रिशूल दीक्षा समारंभ दि. ७ मार्च रोजी दु. ३ वा. करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार असून दु. १ ते ३ या वेळेत महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच शौर्य संचलन सायं. ४ वा. विकी मंगल कार्यालय येथून सुरू होऊन सुभाष चौक- डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा- जय महाराष्ट्र चौक- छत्रपती शिवाजी महाराज पुतळा- सुभाष चौक- जय महाराष्ट्र चौक- फुलसुंदर चौक मार्गे किल्लावेस येथे आल्यावर समाप्त होईल. त्यानंतर सायं. ६ वा. महाआरती व प्रभू श्रीराम यांची भव्य शोभायात्रा करमाळा शहरातून निघणार आहे.

 

देव, देश, धर्म आणि संस्कृती चे रक्षण करण्यासाठी तसेच हिंदू समाज, हिंदू माता भगिनिंचे रक्षण, धर्मांतर, लव जिहाद, गोवंश हत्या, मंदिरांचे देव देवतांची विटंबना थांबवण्यासाठी, अधर्माचा अंधकार दूर करण्यासाठी व हिंदुत्वाची, राष्ट्रभक्तिची धगधगती ज्वाला प्रज्वलित करण्यासाठी विश्व हिंदू परिषद बजरंग दलाचे ७०० पेक्षा अधिक युवक त्रिशूल दीक्षा घेणार आहेत. या कार्यक्रमासाठी जास्तीत जास्त हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे. असे आवाहन विश्व हिंदू परिषद बजरंग दल करमाळा यांच्या वतीने करण्यात आले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close