-->
करमाळाकृषी विषयकसामाजिक

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्यावी; स्वाभिमानीची तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे मागणी

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

करमाळा तालुक्यात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या पिकांचे त्वरित पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना पिकांची नुकसान भरपाई देण्यात यावी. अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी करमाळा तहसीलदार यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.

संपूर्ण महाराष्ट्रात झालेल्या नुकसान कारक पावसामुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. त्यात करमाळा तालुक्यातील सर्व भागात नुकसान कारक पावसामुळे सर्व प्रकारची पिके वाया गेली आहेत. तसेच आधीच कोरोनाने शेतकरी देशोधडीला लागला आहे. त्यात ह्या अती वृष्टिमुळे होते नव्हते ते सर्व हाताशी आलेले पीक वाहुन गेले आहे. यामुळे शेतकरी पुर्ण पणे कोलमडला आहे. त्याला किमान आधारभूत भरपाई तरी मिळावी. यासाठी प्रशासनाने नुकसान झाललेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे पंचनामे करून तत्काळ मदत मिळ‌वून द्यावी. अन्यथा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने तिव्र आंदोलन करण्यात येईल याची नोंद घ्यावी. असे निवेदन तहसीलदार करमाळा यांना

यावेळी सदर निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटना करमाळा तालुका अध्यक्ष सुदर्शन शेळके, जिल्हा उपाध्यक्ष दिपक शिंदे, तालुका युवा अध्यक्ष अमोल घुमरे, तालुका पक्षाध्यक्ष बापू फरतडे, तालुका युवा उपाध्यक्ष बापू वाडेकर, जातेगाव शाखाध्यक्ष अशोक लवंगारे स्वाभिमानी शेतकरी केतन काळे आदी शेतकरी व पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close