-->
आरोग्यकरमाळाराजकियसामाजिक

भाजपा युवा मोर्चा च्या वतीने आरोग्य तपासणी व रक्तदान शिबिर संपन्न

 

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा सोलापूर जिल्हा ग्रामीण च्या वतीने करमाळा येथे आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबीर संपन्न झाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबर ते ०२ ऑक्टोंबर दरम्यान सेवा समर्पण अभियान सुरु आहे. या अभियानांतर्गत करमाळा तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त आज दत्त मंदिर, विकास नगर, करमाळा येथे आरोग्य तपासणी शिबिर व रक्तदान शिबिर संपन्न झाले असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चा महाराष्ट्र प्रदेश सचिव दीपक चव्हाण व सोलापूर जिल्हा युवा मोर्चा सचिव अमोल पवार यांनी दिली.

कोरोना काळात आपल्या मनामध्ये असलेली भीती घालवण्यासाठी डायबिटीज (शुगर), ब्लड प्रेशर, CBC, हिमोग्लोबिन, रक्तगट.. आदी आरोग्य तपासणी व रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती संयोजकांनी दिली. यावेळी शिबिराचे उद्घाटन ज्येष्ठ नेते विठ्ठलराव भणगे यांच्या हस्ते करण्यात आले.

 

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस किरण बोकण, सरचिटणीस शशिकांत पवार, सुहास घोलप, महादेव (आण्णा) फंड, अमरजित साळुंके, किसान मोर्चाचे जिल्हा सरचिटणीस लक्ष्मण केकान, शहर अध्यक्ष जगदीश अगरवाल, युवा मोर्चा तालुका अध्यक्ष सचिन गायकवाड, व्यापारी आघाडीचे शहर अध्यक्ष जितेश कटारिया, संजय गांधी निराधार समितीचे नरेन्द्र ठाकुर, इस्ञाईल कुरेशी, मयुर देवी, संजय जमदाडे, मनोज कुलकर्णी, संतोश कांबळे, सरडे आण्णा, दया बंडगर, सचिन दुधे आदी कार्यकर्ते उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close