करमाळा प्रतिनिध/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील ढोकरी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी नारायण आबा पाटील गटाच्या ग्रामपंचायत सदस्या साळुबाई चंद्रकांत बोरकर यांची आज बिनविरोध निवड झाली. ठरल्याप्रमाणे मावळत्या सरपंच भामाबाई खरात यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिल्यानंतर रिक्त झालेल्या जागी आज ही निवड करण्यात आली आहे.
गतवर्षी कृषी उत्पन्न बाजार समिती चे सभापती प्रा. शिवाजीराव बंडगर व पैलवान शिवाजीराव खरात यांच्या नेतृत्वाखाली पाटील गटाने सात पैकी पाच जागा मिळवून घवघवीत यश संपादन केले होते. त्यामुळे सरपंच पद हे पाटील गटाकडे आहे.
या प्रसंगी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून खारव, तलाठी बायनड मॅडम, ग्रामसेवक टकले मॅडम उपस्थित होते.




