-->
राजकियराज्यविशेष

वढू बुद्रुक सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल शिवले तर उपाध्यक्ष पदी काळूराम गोसावी यांची निवड

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

श्री क्षेत्र वढू बुद्रुक, ता. शिरूर सोसायटीने शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या मार्गदर्शनाखाली आदर्श पायंडा पाडीत निवडणूक बिनविरोध करताना सोसायटीच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल काळुराम शिवले व उपाध्यक्षपदी काळूराम सदाशिव गोसावी यांची बिनविरोध निवड करताना गावातील शिवले, भंडारे, आरगडे हे तिन्ही घटक एकत्र येत तालुक्यात एकीचे दर्शन घडविले. 

 

 

सोसायटीच्या अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी सहाय्यक निबंधक तथा निवडणुक निर्णय अधिकारी एस.एस. कुंभार व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी अनिक कुंभार यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या निवडणुकीत अध्यक्ष व उपाध्यक्षपदासाठी अनुक्रमे प्रफुल्ल काळुराम शिवले व कालुराम सदाशिव गोसावी या दोघांचे एकमेव अर्ज दाखल झाल्याने अध्यक्षपदी प्रफुल्ल काळुराम शिवले व उपाध्यक्षपदी काळूराम सदाशिव गोसावी यांची बिनविरोध निवड झाल्याने निवडणूक अधिकारी एस.एस. कुंभार यांनी सांगितले.

 

 

या कार्यक्रमावेळी सरपंच सारिका शिवले, उपसरपंच हिरालाल तांबे, माजी सरपंच अंकुश शिवले, अनिल शिवले, रेखा शिवले, ज्ञानेश्वर भंडारे, कृष्णा आरगडे, राहुल कुंभार, अंजली शिवले, रेखा शिवले, राजाभाऊ आहेर, भाऊसाहेब शिवले, शंकर आरगडे, हरिभाऊ भंडारे, योगेश आरगडे, पोलीस पाटील जयसिंग भंडारे, संतोष भंडारे, अंकुश भंडारे, सोमनाथ भंडारे, सचिन भंडारे, जालिंदर आरगडे, बबनराव शिवले, समाधान भंडारे आदी उपस्थित होते.

 

 

विविध कार्यकारी सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी प्रफुल्ल काळुराम शिवले व उपाध्यक्षपदी काळुराम सदाशिव गोसावी व संचालक संतोष शिवले, आनंदा शिवले, कांताराम आरगडे, अंकुश भंडारे, जालिंदर हरिभाऊ शिवले, अर्चना शिवले, रत्नमाला आरगडे, बळीराम गायकवाड या संचालकांचाही सत्कार करण्यात आला.

 

 

जिल्हा बँकेचे संचालक आमदार अ‍ॅड. अशोक पवार यांच्या माध्यमातून शेतक-यांना कृषी व थेट कर्जपुरवठा करण्याबरबरच सोसायटीची स्वतंत्र इमारत बांधत फर्निचर करून जिल्ह्यात आदर्शवत सोसायटी निर्माण करु असे आश्वासन सोसायटीचे नवनिर्वाचीत अध्यक्ष प्रफुल्ल काळुराम शिवले यांनी दिले.

 

या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जयसिंग भंडारे यांनी तर आभार सरपंच सारीका अंकुश शिवले यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close