-->
करमाळासामाजिक

केम येथील स्मार्ट अंगणवाडी व पोषण आहार सप्ताहाचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम येथील इंदिरा नगर येथील स्मार्ट अंगणवाडी व पोषण आहार सप्ताहाचे उद्घाघाटन सोहळा मोठ्या उत्साहात आज संपन्न झाला. या अंगणवाडीचे उद्घाटन सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व माजी जिल्हा परिषद सदस्य दिलीप दादा तळेकर तसेच शिवसेना महिला आघाडी तालुकाध्यक्ष सौ.वर्षाताई चव्हाण मॅडम यांचे हस्ते झाले. यावेळी उपमुख्यकार्यकारी अधिकारी शेख साहेब ऊपस्थित होते. या अंगणवाडी साठी सेविका म्हणून अंजली लोखंडे यांची तर मदतनिस म्हणून कावळे मॅडम यांची निवड झाली. या अंगणवाडीचे शेख साहेबांनी कौतुक केले.

यावेळी श्री ऊत्तरेश्वर मंदिराच्या हॉलमध्ये पोषण आहार सप्ताहाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाचे ऊद्घघाटन जिल्हा अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी शेख साहेब, गटविकास अधिकारी मनोज राऊत, अंगणवाडी सुपरवायझर पवार मॅडम, सरपंच आकाश भोसले यांचे हस्ते तर उपसरपंच नागनाथ तळेकर, विस्तार अधिकारी म्हत्रे साहेब, माने साहेब, दिलीप दादा तळेकर, यांचे हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी अंगणवाडी सेविका, मदतनिस यांनी वेगवेगळा पोषण आहार बनवला होता. त्याची चव जिल्हाध्यक्ष कांबळे व शेख साहेब यांनी घेतली. तसेच त्यांचे कौतुक ही केले. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक पवार मॅडम यांनी केले. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे शेख साहेब म्हणाले कि, या पोषण आहार सप्ताहामध्ये अंगणवाडी सेविकांनी या ठिकाणी वेगवेगळे पदार्थ ठेवले होते, त्याची चव मी घेतली. हा प्रत्येक पदार्थ आपल्या आरोग्यासाठी पौष्टिक आहे. आज या आहाराची गरज मुलांना आहे. असे प्रतिपादन यावेळी त्यांनी केले. या वेळेस त्यांनी अंगणवाडी सेविकांचे कौतुक केले. गटविकास अधिकारी मनोज राऊत मार्गदर्शन करताना म्हणाले कि, सर्व मुलींसाठी, गरोदर मातांसाठी व स्तनदा मातेसाठी बनविलेला पोषण आहार हा महिलांनी आपल्या आरोग्यासाठी खाल्लाच पाहिजे. असा सल्ला त्यांनी यावेळी दिला आहे.

या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे म्हणाले कि, आपल्या शेतात आपण दुर्लक्षित करतो ती संतापाची भाजी आरोग्यासाठी पोषक आहे. पण, आपण ती खात नाही. तसेच पात्रांची भाजी सुध्दा आपण खात नाही. या भाजीच्या सेवनाने तर आपले शरीर निरोगी बनते. आपल्याला महागडे प्रॉडक्ट वापरण्याची सवय झाली आहे. त्यामुळे आपल्याला पौष्टिक आहार मिळत नाही. गावरान भाज्या खाऊन शरीर सुदृढ करा असे प्रतिपादन त्यांनी केले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालन विस्तार अधिकारी म्हेत्रे साहेब यांनी केले. तर आभार ग्रामविकास अधिकारी नवनाथ सातव यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अंगणवाडी सुपरवायझर, अंगणवाडी सेविका व मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

या कार्यक्रमाचे वैशिष्ट्य गौरी नितीन तळेकर या मुलीने जलवा या गाण्यावर सुंदर नृत्य केले. या मुलीचे सर्व मान्यवरांनी कौतुक केले. पोषण महाअभियान महिला, बालक व अंगणवाडी सेविका, मदतनीस यांनी पोस्टिंग आहार पाककृती सादर केल्या.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close