-->
करमाळाराजकियसामाजिक

महावितरण आमच्या सहनशीलतेचा अंत पाहणार आहे काय.? माजी.आ. नारायण पाटील यांचा संतप्त सवाल

 

प्रतिनीधी/ऋषिकेश चव्हाण

शेतीपंपाची सक्तीची वीजबिल वसूली तातडीने थांबवून आठ तास अखंडीत वीज पुरवठा सुरू करा. अन्यथा आंदोलन आणखी व्यापक व तीव्र करण्यात येईल असा इशारा आज (दि.२८ फेब्रु.) रोजी माजी आमदार नारायण पाटील यांनी आंदोलनस्थळी महावितरण व प्रशासनास दिला. करमाळा तालुक्यातील शेतीपंपाचा वीज पुरवठा वीजबील वसूलीच्या नावाखाली सध्या खंडीत झाला आहे. या सक्तीच्या वसुलीमुळे शेतकरी त्रस्त झाले आहेत. यावर शेतकऱ्याची बाजू मांडण्यासाठी माजी आमदार नारायण पाटील यांच्या नेतृत्वाखाली करमाळा तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

 

यावेळी बोलताना माजी आ. नारायण पाटील म्हणाले की, शेतकरी हा जगाचा पोशिंदा असुन वीजबील वसुलीपायी त्याच्या उभ्या पिकांचे नुकसान करणे म्हणजे राज्याचे वा देशाचे नुकसान करण्यासारखे आहे. त्याच्या इमानदारीवर विश्वास ठेवून महावितरणने सबूरीने वसुली करावी. वरीष्ठ पातळीवर घेतले गेलेले धोरणात्मक निर्णय आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या बांधावरचे वास्तव यात जमीन आसमानचा फरक आहे. तालुक्यातील काम करणाऱ्या महावितरणच्या अधिकार्‍यांनी वरीष्ठ पातळीवर सत्य परिस्थितीचा अहवाल पाठवला पाहिजे. थ्री फेजसह सिंगलफेज वीज पुरवठाही बंद करुन महावितरण आता आमच्या सहनशीलतेचा अंत पाहणार आहे काय.? असा संतप्त सवाल ही त्यांनी केला. जर तातडीने सलग आठ तास वीजपुरवठा पूर्ववत नाही केला तर आणखी तीव्र आंदोलन केले जाईल. असा इशाराही पाटील यांनी यावेळी दिला. प्रास्ताविक पाटील गटाचे प्रवक्ते सुनील तळेकर यांनी केले.

 

यावेळी तहसीलदार समीर माने, पोलीस निरीक्षक सूर्यकांत पाटील व महावितरणचे जेऊर तसेच करमाळा विभागाचे अधिकारी आंदोलनस्थळी उपस्थित राहून त्यांनी सदर निवेदन स्विकारले. यानंतर तहसीलदार यांच्या दालनात पोलीस निरिक्षक व महावितरणचे अधिकारी यांच्या सोबत माजी आमदार नारायण पाटील व त्यांच्या समवेत असलेल्या शिष्टमंडळ यांनी चर्चा केली.

महावितरणच्या वरीष्ठ अधिकाऱ्यांना भ्रमणध्वनी वरुन थेट संभाषण करुन यावर परत उद्या आणखी एक बैठक घेण्यात येणार असल्याचे नक्की झाले. तोपर्यंत तातडीने सिंगल फेज वीज सुरु करुन थ्री फेज वीज पुरवठा दोन तास देण्याची हमी महावितरणकडून देण्यात आली व त्यावर लगेच कार्यवाही झाली. उद्या वसुलीच्या रकमेबाबत व सवलतीबाबत तोडगा निघणार आहे. या आंदोलनात हजारो शेतकरी सहभागी झाले होते.

यावेळी जि.प. सदस्या सवितादेवी राजेभोसले, नवनाथ झोळ, बिभीषण आवटे, पं.स. सभापती अतूल पाटील, सदस्य दत्ता सरडे, नागनाथ लकडे, प्रा. बिले सर, पृथ्वीराज पाटील, महेश चिवटे, महेंद्र पाटील, डाॅ. अमोल घाडगे, दराडे गूरुजी, धुळाभाऊ कोकरे, रमेश कांबळे, संतोष जाधव-पाटील, दत्ता गव्हाणे, गणेश चौधरी, रणसिंग बापू, रामेश्वर तळेकर, हनूमंत सरडे यासह अनेक आजी माजी पदाधिकारी व शेतकरी उपस्थित होते.

यावेळी भाजपाच्या वतीने राज्यसचिव दिपक चव्हाण, तालूका सरचिटणीस अमरजीत साळूंखे, शहर प्रमुख जगदिश अगरवाल, आदेश कांबळे, नरेंद्रसिंह ठाकुर यांनी पाठींबा दिला. तसेच बळीराजा संघटनेच्या वतीने अण्णा सुपनवर यांनीही पाठिंबा दिला.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close