करमाळा
करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे मा. चेअरमन शिवाजीराव तळेकर यांचे निधन
केम प्रतिनिधी/संजय जाधव


करमाळा तालुक्यातील केम येथील ज्येष्ठ नेते, महात्मा फुले मागासवर्गीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष व करमाळा तालुका खरेदी-विक्री संघाचे माजी चेअरमन शिवाजी बापु तळेकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.
त्यांचे वयाच्या ८० व्या वर्षी निधन झाले असून त्यांच्या पश्चात्ताप तीन मुले, एक मुलगी, सुना व नातवंडे असा परिवार आहे. ते पनवेलचे तहसिलदार विजय तळेकर व राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे माजी उपाध्यक्ष महेश तळेकर यांचे वडिल होते. तसेच ते केम येथील महात्मा फुले मागासवर्गीय शिक्षण संस्था या संस्थेचे चेअरमन होते. त्यांनी माढा तालुक्यातील आलेगाव येथे माध्यमिक विद्यालय काढले आहे. त्यांच्या निधनाने केम व परिसरातून हळहळ व्यक्त होत आहे.




