करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा पोलीस ठाणे यांच्या वतीने आज दिनांक १३ सप्टेंबर रोजी माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते मॅडम, अप्पर पोलीस अधीक्षक अतुल झेंडे साहेब यांचे मार्गदर्शनाखाली माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. विशाल हिरे, पोलीस निरीक्षक करमाळा सूर्यकांत कोकणे यांचे उपस्थितीत ग्रामसुरक्षा दल स्थापन व मार्गदर्शन मेळावा अथर्व मंगल कार्यालय करमाळा येथे आयोजित करण्यात आला होता.
सदर मेळाव्या करीता संचालक ग्राम सुरक्षा यंत्रणा श्री. डि.के. गोर्डे, नायब तहसीलदार जाधव साहेब, गट विकास अधिकारी भोंग साहेब, करमाळा नगर परिषद करमाळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रतिनिधी देशमुख साहेब हे व करमाळा तालुक्यातील ११८ गावातील व ९५ ग्रामपंचायतीमधील पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य व गावातील प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.
करमाळा तालुक्यातील सर्व गावांमध्ये ग्रामसुरक्षा दल स्थापन करून ग्रामसुरक्षा दलाच्या सदस्यांनी आपापल्या गावातील चोरी, दरोडे, महिला विषयी गुन्हे घडणार नाही, पूर परिस्थिती, अवैध धंदे करणारे यांना त्या धंद्या पासून परावृत्त करण्यासाठी कसे नियोजन करायचे याविषयी माननीय पोलीस अधीक्षक तेजस्वीनी सातपुते मॅडम यांनी मार्गदर्शन केले. “ऑपरेशन परिवर्तन” व ग्रामसुरक्षा दलाच्या कामकाजा विषयी माननीय सूर्यकांत कोकणे यांनी माहिती दिली. तसेच माननीय सूर्यकांत कोकणे यांनी कायदा व सुव्यवस्था निर्माण करणारे, गुन्हे करणारे, गुन्ह्यास प्रवृत्त करणारे अशा लोकांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. पोलीस खाते हे जनतेच्या रक्षणासाठी आहे. विनाकारण खोट्या तक्रारी दाखल होऊ नयेत यासाठी गाव पातळीवर ग्राम सुरक्षा दल स्थापन केले आहे. असे सांगून त्यांनी कोणाच्या काही अडचणी असल्यास तात्काळ करमाळा पोलीस ठाणे येथे संपर्क करावा असे आवाहन केले.
करमाळा तालुक्यातील पोलीस पाटील व सरपंच यांचा कार्यक्रम घेण्यात आला. त्यावेळी उपस्थित लोकांची संख्या व उत्साह पाहून असा कार्यक्रम कधीच झाला नाही, यापूर्वीचे अधिकारी होते. परंतु, ते कधी जनमानसात मिसळत नव्हते. जनतेसाठी काम करणारे फक्त सूर्यकांत कोकणे हेच आहेत, मूर्ती लहान पण कीर्ती महान अशी चर्चा पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच व कार्यक्रमास आलेल्या नागरिकांमध्ये चालू होती. यावेळी ग्रामसुरक्षा दलाचे करमाळा तालुक्याचे नोडल अधिकारी म्हणून पोलिस उपनिरीक्षक साने साहेब व किरण पवार साहेब यांनी या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व नियोजन केले होते.
सदर कार्यक्रमाकरिता तालुक्यांतील पाचशे ते सहाशे नागरीक उपस्थित होते. पोलीस खात्याने देखील कोरोना संदर्भात दक्षता घेण्यासाठी कार्यक्रम स्थळी उपाय योजना केली होती.




