केम प्रतिनिधी / संजय जाधव


भारत सरकारच्या राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियाना अंतर्गत “भारत के आझादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमाच्या निमित्ताने करमाळा तालुक्यातील वडशिवणे या गावातील उमेद अभियानांतर्गत स्थापन केलेल्या आदर्श महिला ग्रामसंघाच्या कार्यालयाचे उद्घाटन इंदापूर प्रभाग समन्वयक श्री. डी. जे. राऊत यांच्या हस्ते करण्यात आले.
कार्यालयीन कामकाज करण्यासाठी स्टार्टअप निधीतून या कार्यालयासाठी फर्निचर घेण्यात आले आहे. यावेळी इंदापूरचे प्रभाग समन्वयक डी. जे. राऊत यांनी उमेद अभियानाची संपूर्ण माहिती दशसूत्री च्या माध्यमातून सांगितली.
सदर कार्यक्रमासाठी ग्रामसंघाच्या अध्यक्षा अनिता राऊत, सचिव सरस्वती खारे, सरपंच लक्ष्मी काकडे, लिपिका रोहिणी मगर, सीआरपी बबिता सातपुते, सिटीसी कोमल कळसाईत, ईश्वरी टकले, सुनिता काळे, मदतनीस कल्पना केदार तसेच आदी महिला उपस्थित होत्या. या उपक्रमाचे केम व वडशिवणे परिसरातून स्वागत होत आहे.




