करमाळा प्रतिनिधी


करमाळा तालुक्यातील मांगी येथील सुप्रसिद्ध पार्श्वगायक प्रविणकुमार अवचर यांचे नवीन गणपती भक्तांचा तारणहार या गाण्याचे करमाळा तालुक्याचे आमदार श्री संजयमामा शिंदे यांचे हस्ते लॉचिंग करण्यात आले आहे.
सप्टेंबर महिना म्हटलं की, गणेश भक्तांचा उत्साह शिगेला पोहोचलेला असतो. यातच श्रीगणेशाची विविध गीत रसिकांना ऐकायला मिळतात. अशातच रसिकांना आवडणारे असे गणेशाचे गीत ‘गण गण गण गणपती, भक्तांचा तारणहार गणपती’ हे गीत गायक प्रवीण अवचर यांनी तयार केले आहे. स्वतःचे शब्द व चाल असणारे हे गीत आहे. या गीताला संगीत करमाळा येथील च नासिरभाई व प्रफुल्ल यांनी दिले आहे.
याप्रसंगी या गाण्याचे आमदार श्री. संजयमामा शिंदे यांनी विशेष कौतुक केले व या यु ट्यूब चॅनेल चे त्यांचे हस्ते लॉन्च केले. यावेळी मांगी येथील सामाजिक कार्यकर्ते श्री. सुजित तात्या बागल, जातेगावचे युवा कार्यकर्ते तुषार शिंदे तसेच आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
प्रविणकुमार अवचर यांनी आजवर साधना सरगम, सोनू निगम यांच्यासह अनेक दिग्गज कलाकारांसमवेत संपूर्ण देशभर संगीत शो केले आहेत. सध्या लॉकडाउन असल्यामूळे ते करमाळा येथेच असुन स्थानिक कलावंतांच्या साहाय्याने तसेच उपलब्ध होतील त्या सूविधां आधारे या सूमधूर गणेश गीताचे रेकॉर्डिंग केले आहे. तसेच इथून पूढील काळात *संगीत-रंग* या यूट्यूब चॅनेल च्या माध्यमातून आपल्या गीतांचा आस्वाद संगीत प्रेमींना घेता येईल.
तरी आपण सर्वांनी खाली दिलेल्या लिंक वर जाऊन हे गीत ऐका व चॅनल सबस्क्राईब करा.




