-->
करमाळाविशेष

श्रावण मासातील चौथ्या सोमवार निमित्त उत्तरेश्वराची सजावट कृष्ण रूपात

 

केम प्रतिनिधी/संजय जाधव

 

करमाळा तालुक्यातील केम येथील ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर मंदिरात श्रावण महिन्यातील चौथा सोमवार व गोकुळाष्टमी निमित्त ऊत्तरेश्वराची पुजा, सजावट कृष्ण रूपात साकारण्यात आली होती. ही पुजेची सजावट गणेश गुरव व बाळू गुरव या पुजाऱ्यांनी केली.

 

श्रावण महिन्यातील चौथ्या सोमवारी श्री. उत्तरेश्वर मंदिरात १३ तास अखंड शिवनाम जप करण्यात आले. या जपासाठी एकूण ६५ पुरूष व २५ महिला सहभागी झाले होते. हे जप सकाळी ०६:०० ते सायंकाळी ०७:०० वाजेपर्यंत चालु होते. सुरूवातीला ग्रामदैवत श्री ऊत्तरेश्वर बाबांच्या प्रतिमेचे पुजन कुंकू कारखानदार राजाभाऊ गोडसे व केमचे सुपुत्र जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांचे हस्ते करण्यात आले. या वेळी चेअरमन दादासाहेब गोडसे, कुंभार महाराज, भैरू शिंदे, दत्ता कुलकर्णी, सदस्य विजय बप्पा तळेकर व आदी भाविक उपस्थित होते.

 

श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना मसाले दूध व ॴरती नंतर महाप्रसादाचे वाटप खालील भाविकांनी केले. यामध्ये श्री. ऊत्तरेश्वर रक्तदाते संघटना, संजय कुमार वाघमारे, श्रीमती कमला गंगाधर साखरे, गेला बोंगाळे, सागर राजे मित्रमंडळ, राहुल कोरे, सर्जेराव बिचीतकर, भालचंद्र गावडे, शोभाताई अवताडे, पंडित सुब्राव काळे, ऊत्तरेश्वर टोणपे, मारूती पारखे, संचित रणश्रृगांरे, विठ्ठल रामचंद्र मोरे, प्रमोद चव्हाण, गणेश सोमेश्वर नवले, गणेश गुरव, रामदास काळे, हरिदास शिंदे कुंडलिक देवकर, कांतीलाल गुटाळ यांनी वाटप केले. तर पत्रकार संजय जाधव यांचे वतीने भाविकांना खिचडीचा महाप्रसाद वाटप केला. दर सोमवारी शुभम वेदपाठक या चित्रकाराने वेगवेगळ्या रांगोळी काढल्या होत्या. श्री ऊत्तरेश्वर देवस्थानचे महाराज जयंती गिरी यांनी दर्शनासाठी आलेल्या भाविकांना दररोज चहा वाटप केला. दर सोमवारी भाविक कोरोनाचे नियम पाळून श्री चे दर्शन घेत होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close