-->
करमाळाराजकिय

जिल्ह्यातील युवक भाजपाच्या मुख्य प्रवाहात आणणार; नूतन भाजयुमो जिल्हा सचिव अमोल पवार यांचा निर्धार

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

 

भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या सोलापूर जिल्हा सचिवपदी करमाळा तालुक्यातील वाशिंबे येथील मकाई कारखान्याचे संचालक अमोल पवार यांची निवड सोलापूर भाजपा जिल्हाध्यक्ष प्रकाश घोडके यांनी केली आहे.

 

या निवडीनंतर बोलताना अमोल पवार म्हणाले की, आजच्या पिढीतील तरुण मित्र, कार्यकर्ते यांना भाजपाची विचारधारा आवडत आहे. यासाठी संपूर्ण जिल्ह्यामध्ये आपण प्रवास करून त्यांच्याशी संवाद साधणार आहे तसेच त्यांना युवा मोर्चा मध्ये सामील करून आगामी कालावधीमध्ये शतप्रतिशत भाजप करण्यावर आपला भर राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. देशामध्ये केंद्रात भाजपची सत्ता असून केंद्र सरकारने घेतलेले लोक कल्याणकारी निर्णय तसेच महाराष्ट्र राज्यामध्ये सक्षम विरोधी पक्ष म्हणून भाजपाची कामगिरी उल्लेखनीय आहे.

 

सोलापूर जिल्ह्यात प्रवास करत असताना पक्षाचे संघटन, बांधणी व केंद्र सरकारच्या योजना यावर आपला अधिक भर राहील. पुढील कालावधीमध्ये पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका या निवडणुकांमध्येही युवा वर्ग मोठ्या प्रमाणात सामील करणार असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close