-->
करमाळा

वैद्यकीय अधिकाऱ्याची त्वरित बदली करावी; ‘यांनी’ केली सार्वजनिक आरोग्य विभागाकडे मागणी

आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकाऱ्याचा मनमानी कारभार; विजय ओहोळ यांचे आरोप

केम प्रतिनिधी/संजय जाधव

करमाळा तालुक्यातील केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील वैद्यकीय अधिकारी डॉ. जगदाळे हे मनमानी कारभार करत असून यांची त्वरीत बदली करावी अशी मागणी केमचे सामजिक कार्यकर्ते विजयसिंह ओहोळ यांनी सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र राज्यचे डॉ. प्रदिप कुमार व्यास यांचेकडे निवेदनाव्दारे केली आहे.

या निवेदनात त्यांनी म्हटले आहे की, केम हे गाव करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव असून येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांतर्गत एकूण १९ गावे जोडलेली आहेत. त्यामध्ये तीन उपकेंद्रे असून सध्या या आरोग्य केंद्रात अपुरा कर्मचारी वर्ग आहे. त्यामधील डॉ. जगदाळे हे आपला मनमानी कारभार करत आहेत. ते सामान्य नागरिकांचे फोन सुध्दा उचलत नाहीत तसेच रूग्णांच्या नातेवाईकांना व्यवस्थित वागणूक न देता अरेरावीची भाषा वापरतात. कोवीड काळामध्ये गावातील नागरिकांची लोकसंख्या पाहता गावात अतिशय कमी लसीचे डोस झाले आहेत. डाॅ. जगदाळे यांनी त्यांच्या भागातील जास्त नागरिकांना लसीचे डोस दिले आहेत. तसेच इतर गावांतील १६ च्या वरती स्कोर असलेल्या कोरोना झालेल्या नागरिकांना केम येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अॅडमिट करून घेतले. ते आरोग्य केंद्रातील कर्मचाऱ्यांनाही नीट वागणूक देत नाहीत. रुग्णांसोबत आलेल्या नातेवाईकांशी वाद घालतात. लोकांच्या हिताचे काम ते करत नाहीत.

तरी कृपया डाॅ. जगदाळे यांची त्वरीत बदली करून केम आरोग्य केंद्रामध्ये नवीन वैद्यकीय अधिकाऱ्याची नेमणूक करावी अशी मागणी ओहोळ यांनी केली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close