जेऊर येथे जागतिक महिला दिनानिमित्त २२ व्या ‘महिला महोत्सवाचे’ आयोजन

माय मराठी न्यूज (ऋषिकेश चव्हाण)


जेऊर (ता. करमाळा) येथे जागतिक महिला दिनानिमित्त दि. ८ मार्च ते १४ मार्च दरम्यान २२ व्या ‘महिला महोत्सवाचे’ आयोजन करण्यात आले आहे. माजी आमदार नारायण आबा पाटील मित्र मंडळ व जेऊर ग्रामपंचायतीच्या सहकार्यातून गेली २१ वर्षांपासून अखंडितपणे महिला दिनाचे औचित्य साधून महिलांसाठी विविध प्रकारचे उपक्रम, स्पर्धा आयोजित केल्या जातात. त्याच प्रमाणे याही वर्षी महिला दिनाचे औचित्य साधून महिला महोत्सवात जेऊर व परिसरातील महिलांसाठी भरगच्य कार्यक्रमांची पर्वणी असणार आहे. या महोत्सवाचे उद्घाटन आज शुक्रवार दि. ८ मार्च रोजी सौ. ज्योतीताई नारायण पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जयश्री दळवी, मंगल गादीया, ताहिरा शेख, नंदाताई गादीया, कल्पना पाबळे, जनाबाई कांबळे, रत्नमाला बादल, भाग्यश्री वाघमोडे, अजिता पाटील, ग्रा.प. सदस्या समीरा दोशी, रोहिणी सुतार, यास्मीन शेख, अनिता जगताप, उषा गरड, उज्वला कुलकर्णी, साधना लुणावत, अपर्णा पाथ्रुडकर, सुनिता पाटील, रेणुका दोशी, उषा सरक, अंकिता वेदपाठक, सुनिता वाघमारे, दिपा दोशी, गयाबाई बदे, शीतल पाटील, अलका व्यवहारे, रागीनी ठाकर, राणी सरडे, मंगल जगताप, मनीषा वनवे, मीनाक्षी सरक, भाग्यश्री वाघमोडे, भारती बलदोटा, अश्विनी देशपांडे, मनीषा लोंढे, संजीवनी महामुनी, सुवर्णा सानप, प्रफुल्लता देशपांडे, संगीता तळेकर, माया सपकाळ आदि महिला उपस्थित होत्या.
या कार्यक्रमाचे स्वागतगीत रोहिणी सुतार व अपर्णा पाथ्रुडकर यांनी म्हटले तर समीक्षा कुलकर्णी हिने आभार मानले. या महिला महोत्सवामध्ये ८ मार्चला महिला महोत्सवाचे उद्घाटन, ९ मार्च – रांगोळी स्पर्धा, उखाणे व फनी गेम्स स्पर्धा, १० मार्च – अंताक्षरी व फनी गेम्स, १२ मार्च – वेशभूषा, अभिनय व फनी गेम्स, १३ मार्च- वक्तृत्व, पाककला व फनी गेम्स, १४ मार्च- नृत्य स्पर्धा व बक्षीस वितरण समारंभ अशा प्रकारे कार्यक्रम होणार आहेत.
प्रत्येक महिला ही कलागुणांनी संपन्न असतेच त्यांना फक्त आपल्या कलागुणांच्या माध्यमातून व्यक्त होण्यासाठी एक सुसंस्कृत व हक्काचे व्यासपीठ हवे असते. हाच उद्देश ठेवून मा.आ. नारायण आबा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ते व्यासपीठ महिलांसाठी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न गेली २१ वर्षे अखंडितपणे करत आहोत आणि यापुढे ही करत राहणार आहे.
सौ. ज्योतीताई नारायण पाटील



