-->
राजकियराज्यराशी भविष्य

मोठी बातमी! पक्षविरोधी काम केल्याचा ठपका ठेवत ‘या’ पक्षाचे १४ नगरसेवक ६ वर्षासाठी निलंबित

माय मराठी न्युज नेटवर्क

उस्मानाबाद जिल्ह्यातील तुळजापूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षासह इतर १४ नगरसेवकांवर पक्ष विरोधी काम करत असलेचा ठपका ठेवून त्यांच्यावर कारवाई करत जिल्ह्यातील राष्ट्रवादीने त्यांना पक्षातून निलंबित केले आहे. पक्षाच्या विरोधात काम केल्याने या नगरसेवकांवर ही कारवाई करण्यात आली आहे. त्यांना ६ वर्षाकरीत निलंबित करण्यात आले आहे. हे सर्व नगरसेवक तुळजापूर विधानसभा मतदार संघाचे भाजपा आमदार राणाजगजीत सिंह पाटील यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्यासोबतच काम करत होते.

 

या सर्व नगरसेवकांना ६ वर्षासाठी निलंबित करण्याचा हा निर्णय राष्ट्रवादीने जिल्ह्यातील झालेल्या बैठकीत घेतल्याचे सांगितले जात आहे. या निर्णयानंतर उस्मानाबाद मध्ये राजकीय चर्चेला वाट मिळाली आहे. यावेळी जिल्हा निरीक्षक रमेश बारस्कर यांच्या बैठकीत माजी आमदार राहुल मोटे, ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे, जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार, जिल्हा कार्याध्यक्ष संजय दुधगावकर, प्रदेश चिटणीस सुरेश पाटील हे उपस्थित होते.

 

या नगरसेवकांना पक्षातून करण्यात आले निलंबित

 

नगराध्यक्ष सचिन रोचकरी, विनोद पिंटू गंगणे, नगरसेविका अर्चना विनोद गंगणे, औदुंबर कदम नगरसेविका, पंडितराव जगदाळे, चंद्रकांत कणे, मंजुषा प्रसाद देशमाने, किशोर बाबुराव साठे, आशाताई विनोद पलंगे, विजय राजेंद्र कंदले, रेश्मा अविनाश गंगणे नगरसेविका, वैशाली तानाजी कदम, भारतीताई नारायण गवळी, अश्विनी विशाल रोचकरी या सदस्यांना राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीमधून सहा वर्षाकरीता निलंबित करण्यात येत आहे, अशी माहिती जिल्हाध्यक्ष सुरेश बिराजदार यांनी दिली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close