-->
करमाळाक्राईम

पोलिसांच्या प्रतिमेला काळिमा; पोलिस शिपायनेच केला अल्पवयीन मुलीचा विनयभंग

माय मराठी न्युज

पोलिसांच्या प्रतिमेला काळिमा फासणारी घटना डोंबिवलीत घडल्याचे धक्कादायक वृत्त आहे. पोलीस कर्मचाऱ्यानेच एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला आहे. रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले एक ३५ वर्षीय पोलीस शिपाई हे नांदीवली परिसरात राहत आहेत. त्यांच्याच सोसायटी मध्ये राहणाऱ्या एका १७ वर्षीय मुलीने त्याच्या विरोधात विनयभंग केल्याची तक्रार रामनगर पोलीस ठाण्यात गुरुवारी रात्री दाखल केली.

पीडित अल्पवयीन तरुणीने ही सर्व घटना तिच्या कुटुंबियांना सांगितली. तरुणीचा आरोप आहे की, पोलिस कर्मचाऱ्याने इमारतीचा जिना चढत असताना तिच्यासोबत गैरवर्तन केले. या प्रकरणी डोंबिवलीच्या रामनगर पोलिसांनी ३५४ कलमांतर्गत आरोपी पोलिसा विरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे.

आरोपी पोलीस हा कल्याण डोंबिवली येथील रामनगर पोलीस ठाण्यात कार्यरत होता. याबाबत रामनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सचिन सांडभोर यांनी सांगितले की, तक्रार आल्यावर आम्ही त्याला अटक करुन न्यायालयासमोर हजर केले. न्यायालायने त्याची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली आहे. दरम्यान, कल्याण पोलीस उपायुक्तांनी आरोपी पोलिसाविरोधात निलंबनाची कारवाई केली आहे. या घटनेमुळे कल्याण-डोंबिवली भागात एकच खळबळ उडाली आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close