-->
करमाळासामाजिक

बँक ऑफ इंडिया कोर्टी शाखेत प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेचा लाभ

 

करमाळा प्रतिनिधी

कोरोनाच्या काळात खुप कुटुंबानी कर्ता माणूस गमावला, यानंतर त्या कुटुंबाला खरी गरज असते ते मानसिक आणि आर्थिक आधाराची,असाच आधार प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेमुळे बँक ऑफ इंडिया कोर्टी शाखेच्या एका ग्राहकाच्या कुटुंबाला मिळाला आहे.

बँक ऑफ इंडिया कोर्टी शाखेचे ग्राहक मयत सुरेश जयवंत गरुड (राजुरी)यांनी कोर्टी शाखेत प्रधानमंत्री जीवन विमा योजने अंतर्गत 330 रुपयाचा वार्षिक विमा हप्ता भरून जीवन विमा संरक्षण घेतले होते त्यामुळे त्यांच्या वारसदार श्रीमती शितल सुरेश गरुड यांच्या बँक खात्यामध्ये विम्याची रक्कम रुपये 2,00,000 ( दोन लाख रुपये ) जमा करण्यात आली.

सर्वसामान्य जनतेला कमीत कमी रुपयामध्ये विमा कवच मिळावे म्हनून सरकारने अश्या योजना चालू कल्या आहेत प्रधाममंत्री जीवन ज्योती योजनेमध्ये 18 ते 50 वयोगटातील ग्राहकांना 330 रुपये वार्षिक प्रीमियम भरून रुपये दोन लाखाचे जीवन विमा संरक्षण मिळते तर प्रधानमंत्री सुरक्षा विमा योजनेमध्ये 18 ते 70 वयोगटातील ग्राहकांना 12 रुपये प्रीमियम भरून 2 दोन लाखाचे अपघात विमा संरक्षण मिळते. तसेच वृद्धापकाळामध्ये मासिक पेन्शन साठी प्रधानमंत्री अटल पेन्शन योजना आहे यामध्ये ग्राहकाच्या वया नुसार मासिक काही रक्कम भरून तो वयाच्या 60 वर्षा नंतर रुपये 1000 ते 5000 पर्यंत पेन्शन घेऊ शकतो.

या योजननांचा जास्तीत जास्त ग्राहकांनी लाभ घ्यावा असे आवाहन शाखाप्रमुख श्री. कुमार सर, अधिकारी सतीश पिसाळ, बँक मित्र गणेश जाधव यांनी केले आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close