-->
करमाळाराजकिय

सामाजिक उपक्रम राबवून युवासेनेच्या वतीने शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांना अभिवादन 

 

करमाळा/प्रतिनिधी

 

शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या ९८ व्या जयंतीनिमित्त करमाळा शहर युवासेनेच्या वतीने संपर्क कार्यालयात स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

त्यानंतर करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील रुग्णांना संफरचंद, केळी या पौष्टिक फळाचे वाटप करण्यात आले. तसेच देवीचा माळ येथील मूकबधिर शाळेतील विद्यार्थांना मिष्ठान भोजन देण्यात आले.

 

यावेळी उपजिल्हा युवा अधिकारी मयुर यादव, तालुका युवा अधिकार शंभू फरतडे, शहर युवा अधिकारी समिर हालवाई, शहर समन्वयक प्रसाद निंबाळकर, शिवसेना उपशहर प्रमुख संजय भालेराव, उपशहरप्रमुख अदित्य जाधव, कल्पेश राक्षे, केंगार, तालुका उप प्रमुख पांडुरंग ढाणे, गटप्रमुख बालाजी वाडेकर, चंद्रकांत काका लबडे, शिवाजी नाईकनवरे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close