-->
राजकियराज्य

मुख्यमंत्र्यांची मोठी घोषणा; कोरोना निर्बंधावर काय म्हणाले? वाचा सविस्तर…

 

माय मराठी न्यूज नेटवर्क

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रात्री ०८:०० वाजता सोशल मीडियाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील जनतेशी संवाद साधला. यावेळी त्यांनी कोरोनाची परिस्थिती आणि त्यावरील उपाययोजना याबद्दल माहिती दिली.

महाराष्ट्रातील कोरोनाची लाट कमी झाल्यामुळे निर्बंध शिथिल करण्यात आले आहेत. ज्या नागरिकांनी लशीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांच्यासाठी मुंबईतील लोकल सेवा सुद्धा १५ ऑगस्टपासून सुरू करण्यात येणार आहे. पण हॉटेल, रेस्टॉरंट मॉल आणि मंदिरं अजूनही बंदच ठेवण्यात येणार आहेत. सोमवारी टास्कफोर्स सोबतच्या बैठकीत चर्चा केल्यानंतर मंदिर उघडण्याबाबत निर्णय जाहीर केला जाईल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. आपण आणि आपल्या कार्यालयांतील कामकाजाच्या वेळा विभागून घ्या. ज्यांना वर्कफॉर्म होम शक्य आहे, त्या कर्मचाऱ्यांना वर्कफॉर्म होम करू द्या. आम्हाला कल्पना आहे की, प्रत्येकच वेळी सगळ्यांना बंधनात ठेवता येत नाही. सणासुदीचे दिवस आहेत म्हणून गर्दी करू नका.

गेल्या वर्षभरापासून प्रशासकीय यंत्रणा एकच काम करत आहे. त्यामुळे ही यंत्रणा थकली आहे, असही नाही. दुकाने चालु करण्याची परवानगी मिळावी अशी मागणी होत आहे. मी तर म्हणतो २४ तास दुकाने उघडी ठेवूया, पण कामाच्या वेळेतही मोठा बदल करावा लागणार आहे. जिथे गर्दी वाढतेय तिथे रुग्ण संख्या वाढत आहे. हॉटेल, रेस्टॉरंट व मंदिर खुली करण्यासाठी ८ दिवस लागणार असल्याचे सांगितले. कोरोना गेला आहे अस समजुन दुकाने उघडा अशी मागणी करणे चुकीचे आहे. लोकांचा संयम सुटत चालला असला तरी, संयम हा ठेवावाच लागणार आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

जिथे कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, तिथे कोरोणाचे नियम हे पाळावेच लागणार आहेत. पुण्यात दररोज ९०० रुग्ण संख्या वाढत आहे. सोलापुरात ६०० रुग्ण वाढत आहे, कोल्हापुरात दररोज ५०० रुग्ण संख्या वाढत आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, बीडमध्ये कोरोनाचे रुग्ण वाढत आहे, त्यामुळे या जिल्ह्यांनी काळजी घेण्याची गरज आहे, अशी चिंताही त्यांनी व्यक्त केली.

महाराष्ट्रातील काही घटक लोकांची माथी भडकवून दुकाने चालु करा असे म्हणत आहेत. पण महाराष्ट्रातील हुशार जनतेने या लोकांना बळी पडू नये. महाराष्ट्र मॉडेल आणि मुंबई मॉडेलचं कौतुक सर्वत्र होत आहे. हे कौतुक आमचं नसून सर्वसामान्य जनतेचे आहे. मी, लोकप्रिय मुख्यमंत्री म्हणून सर्व्हेतून समोर आल आहे. हे तुम्हा सर्वांच्या आशीर्वाद आणि सहकार्यामुळे झाले आहे, असंही मुख्यमंत्री म्हणाले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close