मांगी येथील नेत्र तपासणी शिबिरातील पहिल्या दहा रुग्णांची झाली मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया
करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील मांगी येथे दिनांक २९ जुलै २०२१ रोजी उपमुख्यमंत्री मा.ना. अजितदादा पवार साहेब व आमदार संजय मामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मा़. संजयमामा शिंदे मोटार वाहतूक संस्था मर्या, मांगी यांच्या वतीने मोफत आरोग्य तपासणी व नेत्र तपासणी शिबीर घेण्यात आले होते. आज त्यातील पहिल्या १० रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे यशस्वीरीत्या करण्यात आली.

मांगी येथील मोफत नेत्र तपासणी शिबिरामध्ये सुमारे ४७५ रुग्णांची तपासणी करण्यात आली होती. तपासणी केलेल्यांपैकी ज्या रुग्णाला मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्याची गरज होती. त्यातीलच पहिल्या दहा रुग्णांची मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया डॉ. गणेश इंदुरकर जिल्हा नेत्र चिकित्सक अधिकारी सोलापूर यांच्या नेतृत्वाखाली उपजिल्हा रुग्णालय करमाळा येथे यशस्वीरीत्या करण्यात आली. या वेळी दहा रुग्णांना संस्थेचे सचिव सुजित तात्या बागल यांच्या हस्ते फळे वाटप करण्यात आली. तसेच विटचे सरपंच उदय ढेरे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन रुग्णांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी डॉ. कोळेकर, डॉ. खटके, विलास जाधव, औषध वाटप श्रीमती भोसले, श्रीमती शिंदे, श्रीमती ढाकणे, कैलास सुद्रीक, सुहास आगलावे आदी रुग्णांचे नातेवाईक उपस्थित होते.



