
करमाळा/प्रतिनिधी


आदिनाथ सहकारी साखर कारखाना, आदिनाथनगर (ता. करमाळा) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना आज गुरुवार दि. २६ डिसेंबर २०२३ रोजी दोस्ती ग्रुपच्या वतीने शालेय साहित्य व खाऊ चे वाटप करण्यात आले.
प्रजासत्ताक दिनाच्या औचित्य साधून शालेय विद्यार्थ्यांना पेन्सिल, खोड रबर, पट्टी, वही, पेन आणि खाऊचे वाटप दोस्ती ग्रुपच्या वतीने करण्यात आले.
यावेळी अजय शिंदे, रवीशेठ माळवे, नाथा चिंचकर, शैलेश पवार, आप्पा भोसले, दीपक वाघे, संभाजी घोगरे, अजित आरकीले, सागर साखरे, ज्ञानेश्वर सातव, शुभम काशीद, भैय्या खरात, सोळ बंधू, बाळशंकर बंधू, बंटी जगताप, भीमा शिंदे, सर्व शिक्षक, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.



