करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर


करमाळा तालुक्यातील भोसे येथे दिनांक २ ऑगस्ट २०२१ रोजी जिल्हापरिषद प्राथमिक शाळेमध्ये कोविड लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबीराचे उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेस करमाळा विधानसभा मतदारसंघाचे अध्यक्ष भोजराज बापू सुरवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक वालचंद रोडगे, उपसरपंच प्रीतम सुरवसे, सामाजिक कार्यकर्ते बिभीषण रोडगे यांच्या हस्ते संपन्न झाले. या लसीकरण शिबिरामधे भोसे येथील ४० नागरिकांनी कोरोना प्रतिबंधीत लसीचा दुसरा डोस घेतला. तर साधारण ११० नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे. अशा एकूण १५० नागरिकांचे लसीकरण करण्यात आले.
कोरोना विषाणूचा पुन्हा एकदा उद्रेक होऊ लागल्याने त्यावर नियंत्रण मिळवण्यासाठी लसीकरण अत्यंत महत्वाचे आहे. त्या दृष्टीने गावामध्येच लसीकरण शिबिर आयोजन करावे अशी गावातील नागरिकांची ग्रामपंचायतीकडे वारंवार मागणी होत होती. त्या अनुषंगाने ग्रामपंचायत स्तरावर लसीकरण शिबीर आयोजित करण्यासाठी गावचे सरपंच प्रा. डॉ. दिपक सुरवसे, ग्रामपंचायत सदस्य भारत सुरवसे यांनी आमदार संजय मामा शिंदे व वरिष्ठ कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरवठा व प्रयत्न केले. आमदार संजय मामा शिंदे यांनी विशेष शिफारस केली व अँड. राहुलभाऊ सावंत, भोजराज (बापू ) सुरवसे व सुजीत (तात्या) बागल यांच्या प्रयत्नातुन भोसे गावामध्येच लसीकरण शिबीराचे आयोजन करण्यात आले.
सदर कार्यक्रमासाठी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी शहा, आरोग्य सेवक डॉ. डोळस, ग्रामसेवक राम बडे, जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक जाधव सर आणि वीर सर यांनी मोठ्या प्रमाणात सहकार्य केले. संगणक चालक रोडे यांनी गावातील नागरिकांची मोबाईल वर ऑनलाईन नोंदणी कोविड ॲपवर केली. तर लसीकरण शिबिर यशस्वी करण्यासाठी आशा सेविका बागडे, ग्रा.प. सेवक बापू पवार यांनी कष्ट घेतले.
सदर लसीकरन शिबिर पुर्ण झाल्यानंतर लसीकरणासाठी आलेल्या वैदयकीय चमुचे आभार ग्रामपंचायत व समस्थ ग्रामस्थ यांच्या वतीने ग्रामसेवक राम बडे यांनी मानले.



