
प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील शेलगावं (वांगी) येथील सुपुत्र आण्णासाहेब शामराव बेरे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या परीक्षेत महाराष्ट्र राज्यातून उद्योग निरीक्षक पदी १४ व्या क्रमांकावर निवड झाली आहे.
आण्णासाहेब बेरे यांचे प्राथमिक शिक्षण शेलगाव (वांगी) येथील जिल्हा परिषद शाळेमध्ये झाले आहे. तसेच माध्यमिक शिक्षण महात्मा गांधी विद्यालय कर्जत येथे झाले आहे. तर सिंहगड कॉलेज ऑफ इन्स्टिट्यूट येथून त्याने इंजिनिअरिंग ची पदवी प्राप्त केली. सप्टेंबर महिन्यात घेण्यात आलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत महाराष्ट्रातून १४ व्या क्रमांकावर निवड झाली आहे.
आण्णासाहेब यांच्या यशामागे आजी, आई-वडील, दोन भाऊ मित्र परीवार या सर्वाचाही वाटा आहे. तसेच शेलगावचे सरपंच अमर (दादा) ठोंबरे. माजी सरपंच बाळासाहेब बेरे, दाजी नायब तहसीलदार मा. प्रशांत खताळ तसेच शिवशंभो प्रतिष्ठान शेलगाव (वांगी) सर्व सहकारी मित्र परीवार यांचेही मोलाचे मार्गदर्शन लाभले आहे.




