-->
करमाळासामाजिक

सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी पत्रकारांनी लेखणी वापरावी- ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

सर्वसामान्यांचे कष्टकऱ्यांची शेतकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी ज्यावेळेस विरोधी पक्ष कमकुवत पडेल त्यावेळेस पत्रकारांनी विरोधी पक्षाची भूमिका सक्षम पणे बजवावी असे मत ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांनी व्यक्त केले. आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीनिमित्त व पत्रकार दिनानिमित्त आयोजित करमाळा तालुका पत्रकार संघाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ पत्रकार नरसिंह चिवटे यांचा सत्कार पत्रकार संघाच्या वतीने विद्या विकास मंडळाचे सचिव विलासराव घुमरे, काँग्रेसचे नेते सुनील बापू सावंत, नागरिक संघटनेचे अध्यक्ष कन्हैयालाल देवी, भाजपचे अध्यक्ष गणेश चिवटे, जगदीश अग्रवाल, दीपक चव्हाण, मनसेचे नाना मोरे या प्रमुख मान्यवरांच्या वतीने करण्यात आला.

यावेळी पुढे बोलताना नरसिंह चिवटे म्हणाले की, पूर्वीच्या काळी वृत्तपत्र हे एक सामाजिक चळवळ म्हणून चालविण्याची भावना वृत्तपत्र मालकांमध्ये होती. पण आता याचे व्यवसायीकरण झाले असून व्यवसाय जाहिरात व बातमी याचा मिलाफ करून पत्रकारांना बातमीदारी करावी लागत आहे. अशा परिस्थितीत सुद्धा अन्यायग्रस्त शेतकरी, सर्वसामान्य मजूर, पीडित महिला यांची बाजू पत्रकारांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून घेणे गरजेचे आहे. शोध पत्रकारिता ही खऱ्या अर्थाने पत्रकारांच्या कर्तुत्वाला उंची गाठून देणारी पत्रकारिता ठरते. त्यासाठी प्रत्येक पत्रकारांनी शोध पत्रकारितेसाठी आग्रह करून नवनवीन बाबी समाजापुढे आणणे गरजेचे आहे. यावेळी पत्रकार संघाचे माजी अध्यक्ष ॲड. बाबूराव हिरडे म्हणाले की, वयाच्या ८२ व्या वर्षी सुद्धा पत्रकार नरसिंह चिवटे यांनी पत्रकारितेचे नाळ सोडलेली नाही ही कौतुकाची बाब आहे.

यावेळी नासीर कबीर अशोक नरसाळे, अण्णा काळे, विशाल घोलप, सचिन जवेरी, दिनेश मडके, शंभूराजे फरतडे, अविनाश जोशी, सिद्धार्थ वाघमारे, नागेश शेंडगे, जयंत दळवी, सागर गायकवाड, अलीम शेख, अश्पाक सय्यद, दत्तात्रय पाखरे, अशोक मुरूमकर, सुनील भोसले, अण्णासाहेब सुपनर, लक्ष्‍मण भोसले, संजय आप्पा शीलवंत, पिंटू पाटणे प्रदीप देवी, राजुशेठ सोळंकी, संतोष दोशी नरेंद्र ठाकूर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close