-->
करमाळाराजकियसामाजिक

केम येथील जिल्हा परिषद शाळेस ३ खोल्या मंजूर; ‘या’ मान्यवरांच्या हस्ते झाले भूमिपूजन

केम प्रतिनिधी/संजय जाधव

सोलापूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे व केमचे अजितदादा तळेकर यांच्या प्रयत्नाने जिल्हा परिषद सेस फंडातून केम येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस तीन खोल्या मंजूर झाल्या आहेत. या खोल्याचे भुमीपूजन मंगळवार दिनांक २८ डिसेंबर रोजी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले. या भूमिपूजन कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी सोलापूर जिल्हा परिषदचे अध्यक्ष मा.श्री. अनिरुद्ध कांबळे हे होते.

 

यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे नूतन अध्यक्ष धनंजय सोलापुरे, उपाध्यक्ष सचिन शिनगारे, युवा नेते सागर दौंड, युवा सेनेचे अध्यक्ष सागर तळेकर, विष्णू पारखे, ग्रामपंचायत सदस्य अनंता तळेकर, राहुल कोरे, नवनाथ तळेकर, कुंकू कारखानदार मनोज सोलापूरे, ऊपसरपंच नागनाथ तळेकर, रघुनाथ सांवत, दिपक तळेकर, भिमराव पेटकर, भजनदास पारखे, किंग मेकर अजितदादा तळेकर, गव्हाणे साहेब व सर्व शिक्षक वर्ग तसेच आदी ग्रामस्थ उपस्थित होते.

 

यावेळी सागर दौंड आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, या जिल्ह्य परिषद प्राथमिक शाळेला भौतिक सुविधा पुरविण्यासाठी पाठपुरावा करू असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. तर या कार्यक्रमाचे अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे यांनी या शाळेत ज्या सुविधा अपुऱ्या आहेत त्यांचा प्रस्ताव तयार करावा. जिल्हा परिषद मार्फत त्या सुविधा मिळवून देण्याचा प्रयत्न मी करेन असे आश्वासन त्यांनी दिले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन तुकाराम तळेकर यांनी केले. तर आभार मुख्याध्यापक भाऊराव तळेकर यांनी मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close