
करमाळा/प्रतिनिधी


क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे अंतर्गत व जिल्हा क्रीडा अधिकारी सोलापूर आयोजीत शालेय थ्रो बॉल क्रीडा स्पर्धा मंगळवार दि. २२ ऑगस्ट रोजी सिंहगड पब्लिक स्कूल केगाव सोलापूर येथे पार पडल्या. या स्पर्धेमध्ये करमाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत असलेल्या राजुरी (ता. करमाळा) येथील श्री राजेश्वर विद्यालयाच्या संघाने थ्रो बॉल स्पर्धेत जिल्हा स्तरीय विजेतेपद पटकावले आहे.
या स्पर्धेमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व तालुक्यांनी सहभाग नोंदवला होता. करमाळा तालुक्याचे प्रतिनिधित्व करत अंतिम सामन्यात श्री राजेश्वर विद्यालयाच्या १४ वर्ष वयोगटातील संघाने अक्कलकोट संघाचा पराभव करत अंतिम सामना जिंकला व विजेते पदावर आपले नाव नोंदविले. तसेच श्री. राजेश्वर विद्यालयच्या १७ वर्ष वयोगटातील संघाने अंतिम सामन्यात अक्कलकोट संघाकडून पराभव पत्करावा लागल्यामुळे या स्पर्धेत १७ वर्ष वयोगटातील खेळाडूचा संघ उपविजयी झाला. थ्रो बॉल संघातील खेळाडूंना मारुती संदिपान साखरे, राष्ट्रीय खेळाडू विठ्ठल सरोदे (सोलापूर) व संतोष पाटील (अक्कलकोट) यांचे मार्गदर्शन लाभले.
विजयी खेळाडूंचे वैजनाथ स्वामी सेवा मंडळाचे संस्थापक सचिव लालासाहेब गोविंद जगताप सर, प्रशालेचे मुख्याध्यापक अनिल सोपान झोळ, जिल्हा क्रीडा अधिकरी मा. गणेश पवार, जिल्हा थ्रो बॉल अशोसियनचे सचिव मा. संतोष खेंडे व प्रशालेचे सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी व राजुरी ग्रामस्थ यांनी अभिनंदन केले. तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.राजुरी श्री. राजेश्वर विद्यालयाच्या थ्रो बॉल संघास जिल्हा स्तरीय विजेतेपद




