पोट भरल्याचे समाधान दही खाल्ल्याने पोट भरल्याची भावना दीर्घकाळ पर्यंत टिकून राहते. म्हणून २ जेवणामध्ये दही खाल्ल्यास भूक लागत नाही. त्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.


भरपूर प्रथिनयुक्त आहार दह्यात भरपूर प्रथिने, कॅल्शियम जे शरीरात सहज शोषले जाते आणि शरीराची गरज भागते.
ऊर्जेयुक्त आहार दह्याने खूप ऊर्जा मिळते, धकाधकीनंतरचा थकवा निघून जातो. दही+खडी साखर खाण्याने कामशक्ती वाढते. नपुंसकत्व कमी होण्यास मदत होते. पुरुष बीजांची संख्या, गुणवत्ता सुधारते.
प्रतिकारशक्ती वाढते दही खाण्याने शरीरातील प्रतिकार शक्ती वाढवणाऱ्या पेशी कार्य- रत होऊन शरीरातील संरक्षक यंत्रणा बळकट बनते.त्यामुळे विषाणूंचा नायनाट होऊन संसर्गजन्य आजार होत नाहीत. दातातील कीड नाहीशी होते.
मधुमेह नियंत्रित राहतो दह्याने रक्तशर्करेची पातळी योग्य राखली जाऊन मधुमेह नियंत्रित होण्यास मदत होते. मधुमेहामध्ये होणारी गुप्तांगांची खाज कमी होते.
पचनक्रिया सुधारते दही पचायला हलके तसेच दह्यामुळे जठर, आंतड्यातील पाचक रस स्त्रवण्यास मदत होते. जेणेकरून जड अन्नदेखील सहज पचते. खूप तिखट, तेलकट, मसालेदार, चमचमीत जेवणात दही खाण्यास आहार बाधत नाही.
हृदयविकाराची शक्यता कमी होते दह्यामध्ये रक्तातील चरबी घटवण्याची क्षमता आहे. त्यामुळे विविध हृदयविकारांची शक्यता कमी होते. रक्तदाब नियंत्रित राहतो.
जीवनसत्वानी परिपूर्ण विटॅमिन बी ५, बी १२ सारख्या जीवनसत्वानी परिपूर्ण असलेने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते व मज्जासंस्था निरोगी राहते. कॅल्शियम, जीवनसत्व ‘ड‘ मुळे दात, हाडे बळकट होतात. मणक्याचे आरोग्य सुधारते.
आतड्यांचे आरोग्य सुधारते लॅक्टोबॅक्टेरीया सारखे आतड्यांच्या आरोग्यास पोषक जीवाणू दह्यात असल्याने आतड्यांचे आरोग्य सुधारते. आतड्यांचा कर्करोग होण्याची शक्यता कमी होते. पोट नियमित साफ होते.
चेहरा, त्वचा उजळते चेहऱ्यावर, त्वचेवर मध+बदाम तेलासोबत १५ मि.दही वापरल्याने मृत, रापलेली त्वचा निघून जाते, कांती उजळ बनते. संत्र्या च्या सालीसोबत दही लावल्याने रंग उजळतो. गुलाबपाणी, हळद सोबत दही लावल्याने त्वचा उजळ, मुलायम बनते. लिंबूरस, दह्याच्या वापराने त्वचेवरील, चेहऱ्यावरील सुरकुत्या कमी होण्यास मदत होते.
केसांसाठी उपयुक्त ३० मि. केसांना दही लावून ठेवल्यानंतर थंड पाण्याने धुतल्यास केस मऊ, रेशमी बनतात. मेंदीसोबत लावल्यास परिणाम आणखी वाढतो. दह्यातून काळीमिरी पूड आठवड्यातून २ वेळा केसांना लावल्यास केसातील कोंडा नाहीसा होतो. केसांच्या मुळांना दही+बेसन लावल्याने केस गळती कमी होते.
मानसिक स्वास्थ्यासाठी
दह्याचा वापर जेवणात सतत केल्याने मेंदूतील सकारात्मक ता वाढवणाऱ्या पेशीमधील रासायनिक प्रक्रिया वाढीस लागून चिंता, नकारात्मक विचार, औदासिन्य कमी होऊन मानसिक स्वास्थ्य टिकून राहणेस मदत होते हे प्रयोगांती सिद्ध झाले आहे. दही, चक्का, पनीर, ताक, कढी, मठ्ठा, रायता, कोशिंबीर, दहीवडे, श्रीखंड इ. माध्यमातून आहारात येते.
अगदी उंट, शेळी, म्हैस, गाय शिवाय इतर सर्व दुभत्या जनावरांच्या दुधाचे दही वापरले जाते. आजकाल सोयाबीन व नारळाच्या दुधाचे दही काही रुग्णांसाठी वापरले जाते.
महत्वाची सूचना:- दुपारी शरीरात पित्ताचा प्रभाव वाढत असतो त्यामुळे तो कमी करुन वात-पित्त-कफ नियंत्रित राहण्यासाठी दही-ताक दुपारच्या जेवणासोबतच घ्यावे. दही रात्री घेऊ नये
Cp आ.ध.गृप



