-->
करमाळागड किल्ले

प्रवास गड-किल्ल्यांचा ध्यास दुर्ग संवर्धनाचा ; बसगड

बसगड / भास्करगड ( Basgad / Bhaskargad )

नाशिक जिल्ह्याच्या पश्चिमेकडे आणि इगतपूरीच्या उत्तरेस एक डोंगररांग पसरलेली आहे, त्यास “त्र्यंबक रांग” असेही म्हणतात. प्राचिनकाळी नालासोपारा, डहाणू, वसई इ बंदरात उतरणारा माल वेगवेगळ्या घाटमार्गांनी नाशिक या शहराकडे जात असे. यापैकी गोंडा घाटावर लक्ष ठेवण्यासाठी ‘बसगड’ किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.

नाशिक मधील प्रसिध्द हरिहर किल्ल्याच्या जवळच बसगड हा किल्ला आहे.
निरगुडपाडा हे गाव हरिहर आणि भास्करगड या दोन्ही किल्ल्यांचे पायथ्याचे गाव आहे.

बसगड किल्ल्याला भास्करगड म्हणूनही ओळखले जाते. या किल्ल्याचा इतिहासामध्ये फारसा उल्लेख आढळत नाही. किल्ल्यावरती जाणारा कातळात कोरलेला सर्पिलाकार मार्ग आणि सातवाहन काळातील पाण्याचे टाके किल्ल्याचे प्राचीनत्व सिद्ध करतात.
इ.स. १२७१ ते १३०८ या काळात बसगड देवगिरीच्या अधिपत्याखाली होता.त्यानंतर किल्ला बहामनी व त्यानंतर निजामशाहीमध्ये आला. १६२९ मध्ये शहाजीराजेंनी निजामशाहीच्या शेवटच्या काळात बंड केले तेव्हा बसगड शहाजीराजेंच्या ताब्यात आला.
१६३३ ला बसगड मोगलांच्या ताब्यात गेला.
१६७० मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचे पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी नाशिक मधील बहुतेक किल्ले जिंकले तेव्हा बसगड ही स्वराज्यात दाखल झाला. १६८८ मध्ये किल्ला पुन्हा मोगलांच्या ताब्यात गेला. १७३० मध्ये कोळी लोकांनी बंड करून किल्ला ताब्यात घेतला पुढे १८१८ पर्यंत बसगड किल्ला पेशव्यांच्या ताब्यात होता.

किल्ल्यावरील बघण्यासारखी ठिकाणे :-

भास्करगडचा माथा बेसॉल्ट खडकाचा बनलेला आहे. किल्ल्याचे मुख्य आकर्षण म्हणजे काताळात खोदून काढलेला सर्पिलाकार जिना. असमान उंचीच्या पायर्‍या असलेल्या या जिन्याच्या दोन्ही बाजूला १० फूट उंचीच्या कातळभिंती आहेत. जिन्याचा मार्ग आपल्याला पश्चिमाभिमुख प्रवेशद्वारासमोर घेऊन जातो. प्रवेशद्वार कमानीच्या महिरपीपर्यंत मातीत गाडल गेलेल आहे. प्रवेशद्वारातून रांगत जाऊन किल्ल्यात प्रवेश करावा लागतो. प्रवेशद्वाराच्या आतील रचनेवरुन तेथे पहारेकर्‍यांसाठी देवड्या असाव्यात. पण आज हा सर्व भाग मातीखाली गाडला गेलेला आहे.

प्रवेशद्वारातून किल्ल्यात शिरल्यावर समोर व उजव्या बाजूला अशा दोन वाटा फूटतात. या दोनही वाटा किल्ल्याच्या पठारावर जातात. पण उजव्याबाजूच्या पायवाटेने १० मिनीटे चढल्यावर आपण किल्ल्याच्या विस्तिर्ण पठारावर पोहचतो. किल्ल्याच्या पठारावर पडक्या वास्तूंचे, मंदीराचे अवशेष, बुजलेली टाक, साचपाण्याचा तलाव त्याच्या कठी असलेला व दगडात कोरलेला हनुमान असे अवशेष पाहायला मिळतात.

सूचना :-
गडावर पाण्याची सोय नाही.
गडावर जेवणाची सोय नाही.
गडावर राहण्याची सोय नाही.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close