थेऊर येथे एक कोटी रुपयांचा विविध विकास कामांचे आमदार अशोक पवार यांच्या हस्ते उद्घाटन
हवेली प्रतिनिधी/प्रविण शेंडगे


थेऊर येथील ग्रामपंचायतीच्या एक कोटी रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन आमदार ॲड. अशोक पवार यांच्या हस्ते करण्यात आले.
१-ग्रामपंचायत बहुउद्देशीय इमारत उद्घाटन
२-थेऊर नायगाव शिव रस्ता येथील शिवदत्त नगरी मधील नवीन पाणी टाकी व वितरण करणे
३-गावठाण अंतर्गत नवीन पाणीपुरवठा नलिका करणे
४-गावठाण जि. प. शाळा येथील अंगणवाडी इमारत बांधणे
५-सिद्धेश्वर मंदिर रस्ता सिमेंट काँक्रीट करणे, आधी विकास कामांचे भूमिपूजन व उद्घाटन करण्यात आले

“विकास हाच आपला खरा ध्यास आहे या हेतूने माझ्यासारखा कार्यकर्ता हा त्यासाठी काम करीत असतो त्यामुळे ग्रामीण भागाचा निधी पुरत नाही. त्यामुळे विविध योजनांच्या माध्यमातून विकासकामे” ही जनतेपर्यंत पोहोचविण्याचे काम करीत आहे.
जनतेने माझ्यावर टाकलेल्या जबाबदार्या यापुढेही पूर्ण करत राहणार असल्याचे प्रतिपादन शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार यांनी केले.
यापुढे बोलताना थेऊर ग्रामपंचायतीचे कार्य कौतुकास्पद आहे तसेच श्रीक्षेत्र थेऊर ते थेऊर फाटा रस्त्याचे काम लवकरच पूर्ण करण्यात येईल असेही ते म्हणाले. थेऊर येथील लसीकरण करण्यासाठी ग्रामपंचायत सह गावातील तरुणांनी सहभागी होऊन लसीकरणात पुढे घेऊन जाण्याचे आवाहन केले.

हवेली तहसीलदार कार्यालयाच्या अधिकाऱ्यावर असणाऱ्या कामाचा बोजा व ताण कमी करण्याच्या उद्देशाने हवेलीचे महसूल विभागाचे विभाजन करण्याचा प्रस्ताव घेऊन प्रत्यक्षात अमलात आणला आहे असेही ते म्हणाले.
यावेळी राज्य कामगार संघाचे अध्यक्ष तात्यासाहेब काळे, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, यशवंत साखर कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग (आप्पा) काळे, लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोकाशी सर, थेऊर ग्रामपंचायत सरपंच शितल काकडे, ग्रामपंचायत सदस्य विठ्ठल (नाना) काळे, युवराज काकडे, राहुल कांबळे, शशिकला कुंजीर, सीमा कुंजीर, रूपाली रसाळ, मंगल धारवाड, गौतमी कांबळे, ग्राहक कल्याण समिती हवेली तालुका अध्यक्ष सौ कविता बाळासाहेब शेडगे, नम्रता कांबळे, ग्रामविकास अधिकारी दयानंद कोळी, संजय कुंजीर, शरद काकडे, शहाजी जाधव, दत्ता तांबे, आनंदा वैराट, मारुती कांबळे, खंडू शेठ गावडे, महबूब सय्यद, अण्णा बोडके (महाराज) भगवान शेडगे, आदी मान्यवर उपस्थित होते.



