-->
आरोग्यकरमाळासामाजिक

मांगी येथील कोव्हिड लसीकरण शिबिर संपन्न; नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

 

करमाळा प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

आज मांगी ग्रामपंचायत येथे कार्यसम्राट आमदार श्री. संजय (मामा) शिंदे यांचे सहकार्याने व सामाजिक कार्यकर्ते सुजित (तात्या) बागल यांचे प्रयत्नातून लसीकरण शिबिर संपन्न झाले. या शिबिरात १८ ते ४४ वयोगटातील महिला व पुरुष असे २०५ नागरिकांनी आपला सहभाग नोंदवून लसीकरण करून घेतले.

याप्रसंगी सुजित तात्या बागल, ग्रामसेवक प्रदीप मोकाशी, ग्रा. शिपाई संजय सोनवणे, पोलीस पाटील आकाश शिंदे, डॉ. कोळेकर, डॉ. शहा, डॉक्टर देवकर यांची टिम, नर्स, ऑपरेटर टीम नूतन केंद्र प्रमुख श्री. संतोष पोतदार आणि सहकारी, पोलीस कॉन्स्टेबल भोजने साहेब, किरण (चाचा) बागल, संभाजी राजे बागल, वैभव नरसाळे, आशुतोष बागल, दीपक नरसाळे, गायक प्रवीण अवचर तसेच सुजित तात्या मित्र परिवार, मांगी यांचे खुप मोलाचे सहकार्य लाभले. यावेळी सरपंच निर्मलाताई बागल, उपसरपंच श्री. नवनाथ बागल, नूतन महिला ग्रा.स. कु. स्नेहल अवचर, गणेश नरसाळे, पप्पू शिंदे, इतर ग्रा. सदस्य व ग्रामस्थ उपस्थित होते.

सुजित (तात्या) बागल गेली कित्येक वर्ष करमाळा तालुक्यातील गावांसह त्यांचे मांगी गावात हि विविध सामाजिक उपक्रम राबवतात. चारा छावणी, टॅन्करने मोफत पाणी पुरवठा, वृक्षारोपन, स्वच्छता अभियान, ग्रंथालयाकडून मोफत वृत्तपत्रे, पुस्तके, गरीब निराधार गरजू लोकांना अन्नदान, कुकडी पाण्यासाठी आंदोलन असे एक ना अनेक सामाजिक उपक्रम नेहमीच निस्वार्थ पणे राबवत असतात. गेली दोन वर्ष कोरोना महामारीने जनता हैराण झाली असताना मांगी गावात कोव्हिड रुग्णांसाठी कोव्हिड सेंटर ची उभारणी केली यातून शेकडो रुग्ण बरे झाले आहेत. मोफत उपचाराची सोय झाल्यामुळे सामान्य रुग्णांना खूप दिलासा मिळाला. असे गौरवोद्गार मांगी येथील ज्येष्ठ नागरिक हनुमंत बागल यांनी केले.

कधी ही फोटो काढून दिखाव्यासाठी किंवा सत्काराला पुढे न येता दुसऱ्याना मान सन्मान देणारा निस्वार्थी असा दिलदार मोठ्या मनाचा माणूस म्हणजेच सुजित (तात्या) बागल आहेत.

गायक प्रवीण अवचर

मांगी

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close