-->
आरोग्यकरमाळासामाजिक

सुजित बागल यांच्या मागणीला यश; रायगाव पं.स. गणा साठी पहिल्या टप्प्यात ५०० लसी उपलब्ध

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

गेली अनेक दिवसांपासून सामाजिक कार्यकर्ते सुजित (तात्या) बागल यांनी पंचायत समिती रावगाव गणा साठी ५००० लस उपलब्ध करून गावातील लसीकरण गावातच व्हावे याबाबतची मागणी आमदार संजय मामा शिंदे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली होती. या मागणीचा तात्काळ पाठपुरावा करून आमदार संजय मामा शिंदे यांनी लसीकरण बाबतचे आदेश प्रशासनाला दिले असून त्यापैकी उद्या पहिल्या टप्प्यात रावगाव पंचायत समिती गणा साठी ५०० लस उपलब्ध झाल्याची माहिती सुजित तात्या बागल यांनी दिली.

सामाजिक कार्यकर्ते सुजित तात्या बागल हे समाजकार्यात नेहमी अग्रेसर असतात. त्यांनी वृक्षारोपण, मांगी येथे कोविड सेंटर, दुष्काळात टँकरने मोफत पाणीपुरवठा करणे तसेच शेतकऱ्याच्या शेती मालाला योग्य भाव मिळावा यासाठी हमीभाव केंद्र अशी अनेक समाजकार्ये तात्या करत आहेत.
-तुषार शिंदे (जातेगाव)

यावेळी बोलताना ते म्हणाले की, लसींचा पुरवठा हा लस उपलब्धतेनुसार होणार आहे. उद्या बुधवार दिनांक १४/०७/२०२१ रोजी जातेगाव व मांगी ग्रामपंचायत कार्यालयात प्रत्येकी २५० लसी उपलब्ध झाल्या आहेत. १८ ते ६० या वयोगटातील जास्तीत जास्त नागरिकांनी आपले लसीकरण करून घ्यावे. मांगी येथील लसीकरण केंद्रावर पहिल्या डोस साठी वडगाव उत्तर-दक्षिण व भोसे येथील नागरिकांसाठी प्रत्येकी ५० तर मांगी येथील नागरिकांसाठी १०० लसी उपलब्ध झाल्या आहेत. ५० पेक्षा जास्त वय असलेल्या नागरीकांना दुसऱ्या डोस साठी ५० लस उपलब्ध झाल्या आहेत. जातेगाव येथील लसीकरण केंद्रावर जातेगाव, खडकी व पुनवर येथील नागरिकांना दुसऱ्या डोस साठी १०० लसी तर जातेगाव येथील नागरिकांना पहिल्या डोस साठी १५० अशा एकूण २५० लसी उपलब्ध झाल्या आहेत.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close