-->
करमाळाराज्यसामाजिक

करमाळ्याच्या ‘या’ विद्यार्थ्याने स्वप्नील लोणकरला न्याय मिळण्यासाठी केले पुण्यात आंदोलन

मागण्या पूर्ण न झाल्यास मंत्रालयावरून उडी मारू.... एमपीएससी समन्वय समितीचे महेश घरबुडे यांचा इशारा

 

 

माय मराठी न्युज प्रतिनिधी

 

महेश घरबुडे आणि शर्मिला येवले हे स्पर्धा परीक्षा करणारे विध्यार्थी आहेत. गेल्या पाच वर्षांपासून ते पुण्यात राहून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत आहेत. दोन दिवसांपूर्वी स्वप्नील लोणकर या त्यांच्या मित्राने आत्महत्या केली आहे. राज्य सरकारच्या ढिसाळ कारभारामुळेच स्वप्निल लोणकर चा बळी गेला असून या घटनेचा निषेध म्हणून आज महेश, शर्मिला आणि काही विद्यार्थी गणिमा काव्याने पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात घुसले. कार्यालयाच्या वरच्या मजल्यावर जाऊन घोषणाबाजी करत उडी मारण्याच्या तयारीत असताना त्यांना पोलिसांनी अडवले. यावेळी पोलिसांची पळापळ झाली. अचानक विद्यार्थ्यानी केलेल्या आंदोलनामुळे प्रशासन अधिकारी आणि विद्यार्थी यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. घोषणाबाजी केल्यामुळे अख्खे कार्यालय दुमदुमुन गेले.

 

व्हिडिओ पाहण्यासाठी येथे क्लिक करा

 

यावेळी बोलताना महेश घरबुडे म्हणाले की, आपले सरकार अस्तित्वात आल्यापासून एमपीएससी द्वारे शासकीय नोकरी मिळविणे, स्पर्धा परीक्षार्थींना दिवास्वप्नच बनून राहिले आहे. मागील दोन वर्षांपासून आपल्या सरकारने फक्त एकच राज्यसेवेची परीक्षा घेतली आहे. कोरोना, मराठा आरक्षण, तर कधी शासकीय खर्चात कपात असे कारण देऊन विविध शासन आदेश काढत सगळ्या भरती प्रक्रिया मंद करून टाकल्या आहेत. महापरीक्षा पोर्टल बंद करून आपण परत त्याच प्रकारच्या भ्रष्ट आयटी कंपन्यांना गट-क आणि गट-ड च्या परीक्षा देऊन विद्यार्थांचा भ्रमनिरास केला आहे. करोना मूळे आधीच हवालदिल असलेला विद्यार्थी आपल्या या सर्व निर्णयामुळे नैराश्यात गेला आहे. यामुळेच महाराष्ट्रात कितीतरी स्पर्धा परीक्षार्थींनी आत्महत्या केल्या आहेत. त्यामुळे सरकारकडे आमच्या पुढील मागण्या मान्य कराव्यात अन्यथा मंत्रालयावरून ऊडी मारू असा इशारा ही दिला आहे.

 

१)एमपीएससी संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख जाहीर करावी.

 

२) एमपीएससीच्या सर्व नवीन जाहिराती व त्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात यावे.

 

३) विविध परीक्षेत प्रलंबित असलेल्या नियुक्त्या देण्यात येऊन प्रलंबित मुलाखती घेण्यात याव्या.

 

४) सरळसेवा परीक्षा खासगी आयटी कंपन्या मार्फत न घेता एमपीएससी मार्फतच घेण्यात यावी.

 

गरीब, कष्टकरी व शेतकऱ्यांची मुले-मुली आपल्याकडे खूप आशेने या मागण्या करत आहेत. आपल्याला विनंती आहे की, या सर्व मागण्या लवकरात लवकर पूर्ण करण्यात याव्या. अशी मागणी शर्मिला येवले या विद्यार्थिनीने केली आहे. यावेळी करमाळा तालुक्यातील तसेच सोलापूर जिल्ह्य़ातील आणि उभ्या महाराष्ट्रातून आलेले अनेक विद्यार्थी या आंदोलनात सामिल झाले होते. वेळेत पोलिस पोहचले नसते तर आज आणखी एका विद्यार्थ्याचा बळी गेला असता. सुरक्षा जाळी लावल्यामुळे शर्मिला येवले ही विद्यार्थीनी वाचली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close