-->
करमाळागड किल्लेसामाजिक

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित दुर्गराज रायगड किल्ला साफसफाई व स्वच्छता मोहीम संपन्न

केम प्रतिनिधी (संजय जाधव)

छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य आयोजित दुर्गराज रायगड किल्ला साफसफाई स्वच्छता मोहीम क्र. 12 विसापूर, लोहगड, कोरीगड, पन्हाळगड, रामशेज, साल्हेर, मुल्हेर, तोरणा गड, कुलाबा, खर्डा, शिवनेरी, रायगड, दिनांक 4जुलै रोजी पार पडली.
यावेळी गडाच्या पायऱ्यांची स्वच्छता, गडावरील राजदरबार परिसरातील गवत कापने, पिण्याच्या पाण्याच्या रिकाम्या बाटल्या, प्लास्टिकच्या पिशव्या वेगवेगळ्या ठिकाणी कचरा वर्गीकरण करत गडावरील स्वच्छता मोहीम यशस्वी झाली.

यावेळी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य चे अध्यक्ष प्राणजीत गवंडी बोलताना म्हणाले की छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य हा ग्रुप गेली अनेक वर्षापासून गडकिल्ले साफसफाई स्वच्छता मोहीम राबवत आहे. यावर्षी दुर्गराज रायगड किल्ला साफसफाई स्वच्छता मोहीम गड परिसरात 51 वृक्षांचे वृक्षारोपण केले आहे. या मोहिमेत 100 शिवशंभूभक्तांनी उत्स्फूर्तपणे स्वच्छता केली.
यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या चरणी एकच सदिच्छा व्यक्त करतो की सध्या मराठा समाजाला लवकरात लवकर आरक्षण मिळाले पाहिजे.

यावेळी छत्रपती शासन ग्रुप महाराष्ट्र राज्य चे संस्थापक अध्यक्ष प्राणजीत गवंडी,दादासाहेब तनपुरे, शरद मिस्कीन,सचिन नागणे ,जिवन सांगडे, प्रदिप जगताप, नागेश बाबर ,बालाजी बारबोले , राजेंद्र वीर, बाळासाहेब थिटे ,दादा नलवडे , अशोक रदवे, अतुल कदम, समाधान सुंतार ,दादा नलवडे,खंडु लोकरे, गणेश गरदाडे, ज्ञानेश्वर भागडे, रामेश्वर भागडे, समाधान हिवरे , ओंकार जाधव, किरण सांगडे, सचिन जाधव,ओम नलवडे, बालाजी मोरे, शुभम वेदपाठक शिवाजी बिडवे, डिगाबर बागल, दादा गुंड, अक्षय निंबाळकर, आबा लोमटे, यासह 100 शिवशंभूभक्त सहभागी झाले .
शेवटी महेश भाऊ कदम यांनी मोहिमेत सहभागी झालेल्या शिवभक्तांचे आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close