करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


सध्या कोरोना या आजारामुळे सर्व शैक्षणिक आस्थापने, शाळा, महाविद्यालय बंद असल्यामुळे विद्यार्ध्यांचे वर्क फ्रॉम होम पद्धतीने हळूहळू शैक्षणिक काम चालू आहे. याच पार्श्वभूमीवर महात्मा फुले कृषि विद्यापीठ सलग्न साईकृपा कृषी महाविद्यालय घरगाव या महाविद्यालयातील विद्यार्थिनी कृषिकन्या कु. आरती बाळासाहेब सुरवसे आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर या कॉलेजची विद्यार्थिनी कृषिकन्या कु. मयुरी जयंत वारे यांनी ग्रामीण कृषी कार्यानुभव कार्यक्रमामधून रावे प्रकल्पांतर्गत १ जुलै २०२१ रोजी कृषिदिनानिमित्त सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील भोसे ग्रामपंचायत, भोसे येथे भूमिपूजन, प्रतिमापूजन आणि वृक्षारोपण करत येथील नागरिकांना वृक्षलागवड विषयी माहिती दिली. तसेच वृक्षाचे फायदेे सांंगुन त्यांंची काळजी कशी घ्यावी याविषयी मार्गदर्शन केले.

सदर कार्यक्रमाच्या वेळी मा. सरपंच आणि करमाळा विधानसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष भोजराज बापू सुरवसे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे विद्यमान संचालक वालचंद रोडगे, ग्रामपंचायत सदस्य भारत सुरवसे, प्राथमिक शाळा भोसे येथील मुख्याध्यापक सुनिल जाधव सर , अंगणवाडी सेविका सुनीता वारे, जेष्ठ नागरिक बबन भाऊ सुरवसे, ग्रामसेवक राम बडे, वनमाला सुरवसेे, कुंडलिक सुरवसे, जयंत वारे, बाळासाहेब सुरवसे, निर्मला रोडगे, लता शिंदे व इतर ग्रामस्थ उपस्थित होते.
सदर कार्यक्रमासाठी आरती सुरवसे हिला तिच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.के.एच. निंबाळकर, कार्यक्रम अधिकारी ए. ए. शिंदे, कार्यक्रम समन्वयक एस.एस. बंडगर तर मयुरी वारे या विद्यार्थिनीला तिच्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मिलिंद आहिरे, कार्यक्रम अधिकारी प्रा. विकास भालेराव, कार्यक्रम समन्वयक प्रा. सतीश जाधव यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले.
अशा प्रकारे सर्व ग्रामस्थांनी कोरोना च्या पार्श्वभूमीवर सोशल डिस्टनसिंग व मास्क लावून तसेच कोरोनाच्या सर्व शासकीय नियमांचे काटेकोरपणे पालन करून कार्यक्रम शांततेत पार पडला.



