केडगाव येथील शासकीय कुष्ठधाम करिता निधी मंजूर; आमदार संजयमामा शिंदे यांची माहिती

प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण


करमाळा तालुक्यातील केडगाव येथे जिल्हा नियोजन समिती २०२२-२३ जिल्हा महिला व बालविकास विभागाकडून शासकीय कुष्ठधाम सुधारणा करण्याकरिता आपण ३ कोटी ५० लाख रुपयांची मागणी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांच्याकडे केलेली होती. दिनांक ८ डिसेंबर २०२२ रोजी जिल्हाधिकारी महोदयांनी सदर केडगाव येथील शासकीय कुष्ठधाम करीता ३ कोटी ४० लाख ९२ रुपयाची प्रशासकीय मान्यता प्रदान केली असल्याची माहिती आमदार संजयमामा शिंदे यांनी दिली.
केडगाव येथील शासकीय कुष्ठधाम येथे किचन कट्टा, भोजन हॉल व ऑफिस बांधण्यासाठी जिल्हा नियोजन मंडळ सन २०२२-२३ महिला व बालविकास विभागाकडून (राखीव ३ टक्के निधीतून) सदर निधी मंजूर झालेला आहे.
या निधी मधून केडगाव येथील शासकीय कुष्ठधाम येथे असलेल्या रुग्णांसाठी वेगवेगळ्या सोयी सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत.




