-->
करमाळाकृषी विषयकराजकियसामाजिक

करमाळा-माढा तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकरी हवालदिल; सरसकट पंचनामे व कर्जमाफीची मागणी

 

करमाळा/कुर्डूवाडी प्रतिनिधी (माय मराठी न्यूज)

 

रयत क्रांती शेतकरी संघटना व प्रहार जनशक्ती संघटनेच्या वतीने आज गुरुवार दि. २५ सप्टेंबर रोजी करमाळा व माढा तालुक्यातील शेतकऱ्यांना अतिवृष्टी व अवकाळी पावसामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीबाबत शासनाला तातडीने मदत देण्याची मागणी करण्यात आली.

 

कुर्डूवाडी येथील उपविभागीय अधिकारी मुंडे मॅडम, तसेच करमाळा तहसील कार्यालयातील नायब तहसीलदार विजयकुमार जाधव व लोकरे साहेब यांना निवेदन देताना सरसकट पंचनामे करून अटी-शर्ती न लावता तातडीची नुकसान भरपाई व कर्जमाफी करावी, अशी मागणी संघटनांनी केली.

 

गत काही दिवसांपासून करमाळा-माढा परिसरात पूर्व, पश्चिम, उत्तर व दक्षिण चारही दिशांना ढगफुटीसह अतिवृष्टी झाली. ऊस, केळी, द्राक्ष, मका, टोमॅटो, डाळिंब, कांदा आदी पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक जनावरे मृत्यूमुखी पडली आहेत. अनेक घरांची पडझड झाल्याने शेतकरी व शेतमजुरांचे संसार उघड्यावर आले आहेत. संपूर्ण पिके पाण्यात बुडाल्याने शेतकऱ्यांचे आर्थिक स्वप्न उद्ध्वस्त झाले आहे.

 

संघटनांच्या निवेदनात नमूद करण्यात आले की, आधीच कर्जबाजारी असलेल्या शेतकऱ्यांना हमीभाव मिळत नाही, शासनाने दिलेली कर्जमाफीची आश्वासनेही पूर्ण होत नाहीत. त्यामुळे राज्य सरकारने महाराष्ट्रात सरसकट ओला दुष्काळ जाहीर करून जनावरे, घरे व शेतीपिकांचे तातडीने पंचनामे करून मदत द्यावी, तसेच शेतकऱ्यांना हमीभाव, सरसकट कर्जमाफी व ग्रामीण रस्त्यांसाठी जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी करण्यात आली.

 

निवेदन देताना प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा संपर्कप्रमुख अमोल शेठ जगदाळे, रयत क्रांती शेतकरी संघटनेचे जिल्हा संपर्कप्रमुख राजकुमार सरडे, प्रहार जिल्हा उपाध्यक्ष रमेश पाटील, प्रहार करमाळा तालुकाध्यक्ष संदीप तळेकर, शेतकरी नेते विठ्ठल आबा मस्के, प्रहार माढा तालुकाध्यक्ष अमोल केसरे, रयत क्रांती करमाळा तालुकाध्यक्ष शिवशंकर जगदाळे यांच्यासह अजय बागल, जयंतीलाल संचेती, तुषार शिंदे, बाळासाहेब गायकवाड, काका काकडे, भिवाजी वाघमोडे, तानाजी यादव, पोपट पारखे व इतर पदाधिकारी, कार्यकर्ते, शेतकरी व शेतमजूर मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close