-->
आरोग्यकरमाळा

करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील धक्कादायक प्रकार; कोरोना वार्डातच रुग्णाची आत्महत्या

 

करमाळा प्रतिनिधी

करमाळा उपजिल्हा रुग्णालयातील कोविड सेंटर मधील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या रुग्णालयामध्ये कोरोना आजाराला कंटाळून एका महिला रुग्णाने शनिवारी पहाटे ०३:३० च्या सुमारास साडीने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. सदर महिलेचे नाव निर्मला अनिल गायकवाड (वय ५० वर्षे रा. जेऊर) असून या प्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यामध्ये आकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. अविनाश राऊत यांनी पोलिसांना याबाबत माहिती दिली. मागील सात दिवसांपासून निर्मला गायकवाड उपजिल्हा रुग्णालय करमाळा या ठिकाणी उपचार घेत होत्या. परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये काहीही सुधारणा होत नसल्यामुळे कोविड सेंटर मधील डॉक्टरनी त्यांना इतर रुग्णालयात हलवण्याचा सल्ला दिला होता. त्यांना होत असलेल्या असह्य वेदना व त्यातच मागील एका दिवसापूर्वी याच कोविड सेंटरमधील एक कोरोणा रुग्ण दगावला होता. यामुळेच त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलले असावे असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सदरचा हा प्रकार १९ जून रोजी पहाटे ०३:३० सुमारास घडलेला आहे.

मयत निर्मला गायकवाड यांच्यावर त्यांच्या कुटुंबीयांच्या उपस्थितीत करमाळा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close