-->
करमाळासामाजिक

‘या’ संघटनेकडून शिवसेना उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान

शहीद हजरत टिपू सुलतान सामाजिक संघटनेच्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मानपत्र व ट्रॉफी देऊन सत्कार

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या माध्यमातून खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या माध्यमातून करमाळा तालुक्यातील कोरोना रुग्णांना लाखो रुपयांची औषधे  मोफत देण्यात आली. यात महत्त्वाची भूमिका बजावणारे शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख चिवटे यांचा शहीद हजरत टिपू सुलतान सामाजिक बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने कोरोना योद्धा म्हणून सन्मान करण्यात आला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या काळात शिवसेनेच्या वतीने जवळपास दोनशे वीस रेमेडेसिविर या इंजेक्शनचे गोरगरीब गरजू रुग्णांना मोफत वाटप करण्यात आले. त्याचबरोबर खासदार श्रीकांत शिंदे फाउंडेशन च्या वतीने मोफत देण्यात आलेल्या रुग्णवाहिकेतून शेकडो रुग्णांना मोफत सेवा देण्यात आली. शिवसेनेच्या वतीने सुरू करण्यात आलेल्या ऑक्सिजन बँकेच्या माध्यमातून अनेकांना पक्षी टेटर मशिन्स उपलब्ध करून देण्यात आल्या. या सर्व कामाची दखल घेऊन शहीद हजरत टिपू सुलतान सामाजिक संघटनेच्या वतीने शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेश चिवटे यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी संस्थेचे अध्यक्ष इरफान सय्यद, जावेद सय्यद, जीशान खान, साजिद तांबोळी, नईम धारेकरी आदी पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना इरफान सय्यद म्हणाले की, विशेषता मुस्लिम समाजातील गरजू गरीब रुग्णांना शिवसेनेने केलेली मदत आम्हाला अभिमानास्पद आहे. तालुक्यातील कुठल्याही पुढाऱ्यांनी आमच्या समाजातील कोरोना ने अडचणीत आलेल्या रुग्णांना मदत केली नाही. मात्र शिवसेनेने पुढाकार घेऊन घेऊन मदत केली. यावेळी पत्रकार संघाचे सचिव नासीर कबीर, पत्रकार अशोक नरसाळे, अश्पाक सय्यद, विशाल घोलप, जयवंत दळवी, शंभूराजे फरतडे, अलीम शेख, सागर गायकवाड, शेखर स्वामी, सिद्धार्थ वाघमारे, अण्णा काळे, किशोर कुमार शिंदे, हरी पिंपळे, सचिन हिरडे, दत्तात्रय पाखरे, सुनील सूर्यपुजारी आदी पदाधिकारी उपस्थित होते.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close