-->
राज्यविशेषसामाजिक

आदर्श प्रतिष्ठान च्या वतीने गणेश जन्मोत्सव उत्साहात साजरा

 

 

प्रतिनिधी/गजानन गव्हाणे पाटील

 

 

 

“गणपती बाप्पा मोरया – मंगलमूर्ती मोरया” च्या जयघोषात शिरूर तालुक्यातील कोरेगाव भीमाचा महाराजा, आदर्श प्रतिष्ठान चा नवसाला पावणाऱ्या गणपती चा जन्मोत्सव मोठ्या उत्साहात आणि भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी बाप्पा या जगावरील कोरोनाचे संकट जाऊदे – सर्वकडे आनंदी आनंद नांदूदे असे साकडे गणेशभक्तांनी गणपती बाप्पा कडे मांडले.

 

 

 

आदर्श प्रतिष्ठान चे हे ४० वे वर्ष असून यंदा ही कोरोनाच्या संकटात सर्व नियम पाळत भक्तिमय वातावरणात “गणेशजन्म” साजरा करण्यात आला. प्रतिष्ठान च्या महागणपती ला यावेळी आकर्षक विद्युत रोषणाई सोबत फुलांची व यंदा पहिल्यांदाच बिस्किटांचा आकर्षक हार घालण्यात आला होता. तर येणाऱ्या गणेश भक्तांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. याचा परिसरातील ३०० गणेशभक्तांनी लाभ घेतला. गणपती ची आरती गावातील प्रमुख पदाधिकारी आणि मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close