-->
आरोग्यकरमाळाविशेषसामाजिक

करमाळा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने ६८ मुलांना इन्प्लूएंजा लसीकरण

 

करमाळा प्रतिनिधी/ऋषिकेश चव्हाण

करमाळा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने तालुक्यातील लहान मुलांसाठी इन्फ्लूएंजा लसीकरण मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. सदर मोहिमेत ६८ लहान मुलांना इन्फ्लूएंजा चे लसीकरण करण्यात आले आहे.

या लसीकरण मोहीमचे आयोजन करमाळा तालुका केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोसिएशनचे अध्यक्ष दिपक पाटणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले होते. यामध्ये वय वर्षे ०३ ते ११ या वयोगटातील मुलांना इन्फ्लूएंजा चे लसीकरण करण्यात आले आहे. यावेळी डॉक्टर उदयसिंह गायकवाड, प्रमुख उपस्थिती श्री रामचंद्र ब.सा.से.संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयंत दळवी, मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष दीपक पाटणे, सचिव रवींद्र बरिदे, संतोष घोलप, आदेश ललवानी, विनय ननवरे आदि पदाधिकारी उपस्थित होते.

यावेळी बोलताना मेडिकल असोसिएशन चे अध्यक्ष दीपक पाटणे म्हणाले की, यापुढील काळातही आरोग्यविषयक उपक्रम राबविले जातील. तर डॉ. गायकवाड म्हणाले की, हे लसीकरण केल्यामुळे लहान मुलांचे आरोग्य चांगले राहील. सदर लसीकरणाच्या उपक्रमा वेळी करमाळा तालुक्यातील असोसिएशनचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

 

 

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close