-->
करमाळासामाजिक

“माझे गाव कोरोना मुक्त गाव” या संकल्पनेतून करमाळा तालुक्यातील ‘हे’ गाव झाले कोरोना मुक्त गाव

केम प्रतिनिधी : संजय जाधव

‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ हि संकल्पना जिल्हा परिषद चे मुख्य कार्यकारी अधिकारी मा. दिलीप स्वामी साहेब यांच्या आदेशानुसार करमाळा तालुक्यातील सर्वात मोठे गाव केम हे कोरोनामुक्त झाले आहे. अशा गावात जाऊन अधिकाऱ्यांचा सत्कार करावा या अनुषंगाने केम येथे पंचायत समिती करमाळा व ग्रामपंचायत केम यांच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित केला होता.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षपदी मा. जि.प.सदस्य दिलीप दादा तळेकर तर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून केमचे सुपुत्र जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, गटविकास अधिकारी भोंग साहेब, पो.नि. कोकणे साहेब, कृषी अधिकारी चव्हाण साहेब, विस्तार अधिकारी म्हेत्रे साहेब, कृषी अधिकारी पोळके साहेब उपस्थित होते.

सदर कार्यक्रमाची सुरुवात ग्रामदैवत श्री उत्तरेश्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून झाली. सुरुवातीला प्राथमिक आरोग्य केंद्र केम वैद्यकिय अधिकारी व कर्मचारी वर्ग, आशा गटप्रवर्तक, आशा वर्कर, माध्यमिक व जिल्हा परिषदचे सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, तलाठी, कृषी खात्याचे सर्व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी, पोलिस बांधव, गावातील खाजगी डॉक्टर यांचा सन्मान जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, जेष्ठ नेते दिलीप दादा तळेकर, सरपंच आकाश भोसले, उपसरपंच नागन्नाथ तळेकर, ग्रा.पं.सदस्य अनंता तळेकर, राहुल आबा कोरे, कृषी अधिकारी चव्हाण साहेब, गटविकास अधिकारी भोंग साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

याप्रसंगी बोलताना पोलिस निरीक्षक कोकणे साहेब म्हणाले की, जनता जनार्दन ची २४ तास सेवा करण्यासाठी पोलिस नेहमी कार्यरत आहेत. कोरोनाच्या कठीण परिस्थितीत ही केम गावचे योगदान उल्लेखनीय आहे.
गटविकास अधिकारी मनोगत व्यक्त करताना म्हणाले की, केम ग्रामपंचायतीने व आरोग्य विभागाने गावपातळीवर सर्व घटकांना, कर्मचारयांना जबाबदारीचे नियोजन करून दिले. तसेच सर्व शिक्षक बंधू भगिनींनी कोरोना युध्दात योगदान दिले. त्यांचे काम कौतुकास्पद आहे तसेच ग्रामपंचायतचे ग्रामविकास अधिकारी नवनाथ सातव व आपत्ती व्यवस्थापन समितीचे ही काम उल्लेखनीय आहे. म्हणून केम गाव कोरोनामुक्त झाले आहे. त्यामुळे हे सर्वच अभिनंदनास पात्र आहेत.

या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे म्हणाले की, मानवतेच्या भूमिकेतून कोरोना योद्ध्यांनी केलेल्या सेवेमुळे गाव कोरोनामुक्त झाले. कोरोना काळात स्वतःचा जीव धोक्यात घालून गावाची सेवा करणारे कोरोना योद्धे भगवंताच्या रूपाने उभे राहिले आणि त्यांनी अहोरात्र केलेल्या सेवेमुळे गाव कोरोनामुक्त होण्यासाठी “लसीकरणाचा केम पॅटर्न” यशस्वीपणे राबवला गेला आहे.

यावेळी विस्तार अधिकारी म्हेत्रे साहेब शुभेच्छा व्यक्त करताना म्हणाले की, गावातील सत्शील कार्यकर्त्यानी व कर्मचार्यानी फळी तयार करून कोरोना युध्दात केलेले कार्य दिशादर्शक आहे. त्यामुळे केम परिसरातील नागरिकांना वेळेत सर्व सेवा उपलब्ध झाल्या. केम ग्रामपंचायतीने ‘माझे गाव कोरोनामुक्त गाव’ या संकल्पनेची अतिशय चांगली तयारी केल्याबद्दल आभार मानून शुभेच्छा दिल्या. या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षक, ग्रामस्थ, आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, डॉक्टर उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपसरपंच नागन्नाथ तळेकर यांनी केले तर केम केंद्र प्रमुख यांनी आभार मानले.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close