-->
करमाळाविशेषसामाजिक

करमाळ्यात टाळ-मृदंगाच्या निनादात व विठ्ठल नामाच्या गजरात, भगव्या पताका व पारंपारीक पेहरावात अवतरली पंढरी

भाजपाचे युवानेते शंभूराजे जगताप यांचा किंग्ज फाऊंडेशनच्या माध्यमातून शहरवासियांसाठी "सामुहिक दिंडी" सोहळ्याचा योग

 

प्रतिनिधी/अंगद भांडवलकर

 

 

आषाढी एकादशीच्या एक दिवस अगोदरच करमाळा शहरातील शाळकरी मुला-मुलींसाठी, पालक, युवकवर्ग व नागरिकांसाठी “सामुहिक दिंडी” सोहळ्यातून चक्क पंढरपुरातील विठुरायाच्या दर्शनाची अनुभूतीच आली. भाजपाचे युवानेते शंभूराजे जगताप यांच्या संकल्पनेतून व पूढाकारातून तसेच किंग्ज फाऊंडेशन च्या माध्यमातून सार्वजनिक गणेशोत्सव, दहिहंडी तसेच सर्वधर्म समभावाचा संदेश देणारे विविध सण-उत्सव व सामाजिक उपक्रमांची शहर व तालुका वासियांसाठी नेहमीच खास पर्वणी असते. कोरोना काळातील त्यांनी राबवलेले उपक्रम कौतुकास्पद आहेत.

 

 

शनिवार दि. ०९ जुलै रोजी सकाळ पासुनच करमाळा शहरात भक्तीमय वातावरण झाले होते. हातात भगव्या पताका, टाळ-मृदंग, तबला, हार्मोनियम, विणा असे वाद्य वाजवत चिमुकल्यांचा सामूहिक दिंडी सोहळा आयोजित केला होता. या सोहळ्यात महाराष्ट्रासह संपूर्ण भारताच्या संस्कृतीचे दर्शन घडवणारी वेशभूषा परिधान केली होती. यामध्ये विशेषतः श्री राम-लक्ष्मण, विठ्ठल- रुक्मिणी, श्रीकृष्ण या शिवाय आई जिजाऊ, शिवाजी महाराज, स्वामी विवेकानंद, सावित्रीबाई फुले, झाशीची राणी, आहिल्यादेवी तसेच संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर, संत बाळुमामा अशा विविध रूपात शहरातील नगर पालिकेच्या सर्व शाळां, महात्मा गांधी विद्यालय व ज्युनियर कॉलेजसह लीड स्कुल चे शाळकरी मुले-मुली, मुख्याध्यापक- मुख्याध्यापिका, शिक्षक-शिक्षीका, माजी विद्यार्थी-विद्यार्थिनी व पालक दिंडीत उत्साहाने सहभागी झाले होते. याशिवाय शेतकऱ्यांच्या वेषातील वारकरी, खेळाडुंच्या वेशातील, तिरंगा ध्वजाच्या रंगाच्या वेशातील वारकरी, पर्यावरण जागृती, कृषी, वैज्ञानिक, आरोग्य विषयक, शैक्षणिक व विविध सामाजिक संदेश देणारे फलक हातात घेवून या चिमूकल्या वारकर्यांनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले. महाराष्ट्राचा सामाजिक अन् सांस्कृतिक वारसा या दिंडीमूळे जोपासण्याचे काम या निमीत्ताने झाले आहे. महात्मा गांधी विद्यालयाच्या प्रागंणातून सर्व प्रथम आयोजक युवानेते शंभूराजे जगताप यांनी उपस्थितांचे स्वागत केले.

 

 

यावेळी ह.भ.प. साबळे महाराज यांनी दिंडी व अध्यात्माच्या महत्वाचे विवेचन केले. त्यानंतर साबळे महाराज, युवानेते शंभूराजे जगताप, महात्मा गांधी विद्यालयाचे प्राचार्य पोपटराव कापले सर तसेच सर्व न.प. प्रशालांचे मुख्याध्यापक, मुख्याध्यापिका व इतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन व अश्व पूजन करून या ‘सामूहिक दिंडी’ सोहळ्याची सुरुवात झाली. किल्ला वेस- वेताळ पेठ- जय महाराष्ट्र चौक- शिवाजी महाराज पुतळा- सुभाष चौक- डॉ. आंबेडकर पुतळा ते देशभक्त नामदेवराव जगताप क्रिडा संकुल (जिन मैदान) येथे नेत्रदिपक रिंगण सोहळा संपन्न झाला.

 

 

दिंडी प्रवास करताना चिमुकल्या वारकऱ्यांचे शहरवासियांनी उत्साहाने स्वागत केले. दिंडी प्रवासात व रींगण सोहळ्यात फुगडी, लेझीम, अभंग, गौळण गायन, ढोल-ताशा व इतर पारंपारीक वाद्ये वादन, घोडेस्वारी याचा सर्वांनी पावसात भिजत आनंद घेतला. या उपक्रमाच्या आयोजनामुळे करमाळा शहरासह तालुक्यात युवानेते शंभूराजे यांचे सर्वत्र कौतूक होत आहे.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close