
प्रतिनिधी l करमाळा (माय मराठी न्यूज)


करमाळा शहरातील श्रीराम चौक येथे श्रीरामनवमी उत्सव समितीच्या वतीने सालाबादप्रमाणे श्रीरामनवमी उत्सव उत्साहात साजरा करण्यात आला. प्रभू श्रीरामांच्या प्रतिमेची महाआरती मान्यवरांच्या हस्ते करण्यात आली आणि जय श्रीरामच्या घोषणांनी आणि फटाक्यांच्या आतषबाजीने परिसर दुमदुमून गेला.
या वेळी तहसीलदार शिल्पा ठोकडे, पोलीस निरीक्षक रणजीत माने, नगरपालिकेचे मुख्याधिकारी सचिन तपसे, करमाळा अर्बन बँकेचे चेअरमन कन्हैयालाल देवी, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संघचालक डॉ. श्रीराम परदेशी तसेच सर्व कारसेवक आणि रामभक्त यांच्या हस्ते महाआरती करण्यात आली.
उत्सवाला कारसेवक रामहरी कांबळे, भाजपाचे संजय घोरपडे, जगदीश अग्रवाल, जितेश कटारिया, राष्ट्रवादीचे शिवराज जगताप, नगरसेवक प्रशांत ढाळे, युवराज चिवटे, अतुल फंड, सचिन गायकवाड, युवा उद्योजक निखिल चांदगुडे, संदीप पवार, ॲड. राकेश देशमुख, ॲड. प्रियल अग्रवाल, अर्बन बँकेचे मॅनेजर प्रकाश क्षीरसागर, पत्रकार सूर्यकांत होनप, विशाल परदेशी, लिंबराज मदने, नितीन होटकर, उमेश माने, गणेश माने, निलेश माने, शिवकुमार चिवटे, समीर हलवाई, भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रज्ञासेल तथा वंदेमातरम शक्तीसेनेचे संस्थापक अध्यक्ष सुहास घोलप, ग्लोबल इन्स्टिट्यूटचे शिक्षक-विद्यार्थी, जिद्द करिअर अकॅडमीचे शिक्षक-विद्यार्थी तसेच शहरातील अनेक मान्यवर नागरिक उपस्थित होते.
उत्सव यशस्वी करण्यासाठी मराठा मंदिर डेकोरेशनचे दत्तात्रय रेगुडे यांनी सजावट केली. डिजिटल प्रतिमांसाठी अक्षय परदेशी, रांगोळीसाठी मतीन दळवे, तर विद्युतरोषणाई आणि आतिशबाजीसाठी कृष्णा मोबाईल तथा फटाका यांनी सहकार्य केले. तसेच सुहास घोलप, युवराज चिवटे, सूर्यकांत होनप, गणेश माने आणि श्रीरामनवमी उत्सव समितीच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.



