
करमाळा प्रतिनिधी


पुर्व भागातील कोळेगाव सबस्टेशन वरील ट्रान्सफार्मर बसवुण दिल्याची घोषणा करुण आमदार संजय मामा शिंदे यांनी पुर्व भागातील शेतकऱ्यांची दिशाभूल करु नये असे आवाहन पाटील गटाचे युवा नेते योगेश गिरी यांनी म्हटले आहे.
अधिक बोलताना गिरी म्हणाले की, २०१९ पर्यंत कोळेगाव सबस्टेशन वरील 3/15 चा ट्रान्स्फर नारायण पाटील यांनी बसवलेला होता. मात्र कोळेगाव धरणात पाणी नसल्याने त्याचे महत्व लक्षात आले नाही. आमदार संजय मामा शिंदे यांच्या कारकीर्दीतच हा ट्रान्सफार्मर जळाला असताना आठरा दिवसात ट्रान्सफार्मर बसवण्याची सांगून शेतकऱ्यांवर उपकार केल्याची भाषा शिंदे गटाचे भरत आवताडे करत आहेत. मात्र, दोन वर्षांपासून शेतकरी वीज टंचाई चा सामना करत होता. वीजेसाठी वारवंवार मागणी करत होता. त्या वेळेस आमदार संजय मामा शिंदे यांना पुर्वभागातील शेतकऱ्यांची व्यथा दिसली नाही का..? असा सवाल योगेश गिरी यांनी केला आहे.
तसेच भरत आवताडे व संजयमामा शिंदे गटाकडून पंचायत समिती जिल्हापरिषद निवडणूक डोळ्यासमोर ठेवून पुर्व भागातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी हा प्रश्न सोडवला असला तरी मागील दोन वर्षांपासून शेतकऱ्यांची अडवणूक होत असताना दुर्लक्ष केले असल्याचे जनता विसरणार नाही असा इशाराच दिला आहे.




