-->
करमाळाकृषी विषयकराजकिय

मकाई सहकारी साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात पार

 

प्रतिनिधी/करमाळा (माय मराठी न्यूज)

 

मकाई सहकारी साखर कारखान्याची २६ वी वार्षिक सर्वसाधारण सभा कारखाना कार्यस्थळावर उत्साहात पार पडली. कार्यक्रमाची सुरुवात कारखान्याचे संस्थापक, राज्याचे माजी मंत्री लोकनेते स्व. दिगंबरराव (मामा) बागल यांच्या पुतळ्याचे पूजन करून करण्यात आली. यावेळी जेष्ठ सभासद जालिंदर झांजुर्णे, धर्मराज जगताप, अंबऋषी भिल, विठ्ठल लोहार यांच्यासह सर्व संचालक मंडळ व अधिकारी उपस्थित होते.

 

सभेच्या प्रारंभी स्वागत जनरल मॅनेजर हरिश्चंद्र खाटमोडे यांनी केले. श्रद्धांजली ठरावाचे वाचन कार्यकारी संचालक सुनील दळवी यांनी केले. त्यानंतर विद्यमान चेअरमन दिनेश भांडवलकर यांनी विषयपत्रिकेवरील सर्व ठराव वाचून उपस्थित सभासदांच्या एकमुखी मंजुरीने निर्णय घेतले.

 

पुढे बोलताना भांडवलकर म्हणाले की, मकाई कारखान्याचे कामकाज आगामी काळात अधिक गतीने होईल. क्षमताविस्ताराची प्रक्रिया सुरू असून पूर्ण क्षमतेने गाळप करण्याचे उद्दिष्ट आहे. कारखान्याच्या विकासाच्या आड येणाऱ्या अडथळ्यांना थारा दिला जाणार नाही. विरोधकांच्या अपप्रचाराला कोणी बळी पडू नये, असे आवाहन त्यांनी केले. तसेच दिवाळी निमित्त कामगारांना बोनस देण्याबाबत संचालक मंडळात विचार होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.


मकाई सहकारी साखर कारखाना हा सभासदांचा आहे. राजकारण न करता सर्वांनी एकदिलाने काम केल्यासच प्रगती शक्य असून संस्थापक स्व. दिगंबरराव बागल मामा यांच्या विचारानेच कारखान्याची वाटचाल होईल.
– रश्मी (दिदी) बागल,
उपाध्यक्षा- भाजप प्रदेश महिला मोर्चा
संचालिका- राज्य सहकारी साखर कारखाना महासंघ


यावेळी आदिनाथचे माजी चेअरमन धनंजय डोंगरे, आदिनाथचे माजी व्हाईस चेअरमन केरू गव्हाणे, जेष्ठ संचालक बाळासाहेब पांढरे, माजी संचालक डॉ. विजय रोकडे, नामदेव भोगे, महावीर तळेकर, रंगनाथ शिंदे, काशिनाथ काकडे तसेच सर्व आजी-माजी संचालक मंडळ, विभाग प्रमुख, शेतकरी, सभासद, हितचिंतक, पदाधिकारी, पत्रकार व शासकीय अधिकारी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन सतीश निळ यांनी केले तर सूत्रसंचालन शेखर जोगळेकर यांनी केले. वार्षिक सर्वसाधारण सभा राष्ट्रगीत गायनाने समाप्त झाली.

About The Author

Tags

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!
Close
Close